राजकीय व्यक्तींमुळे चर्चेत असलेली मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) द्वैवार्षिक निवडणूक समोर आली असताना मतदार यादी सदोष असल्याचा दावा माजी पदाधिकारी रवी मांद्रेकर यांनी केला आहे. एमसीएच्या उपसमित्यांच्या विविध नोंदींनुसार एमसीएच्या मतदार यादीत समावेश असलेले सात क्लब कार्यरत नसल्यामुळे मतदार यादीतून वगळण्याची आवश्यकता आहे. तसे न झाल्यास निवडणूक प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते, असे मांद्रेकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे. १७ जूनला एमसीएची निवडणूक होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि विजय पाटील अध्यक्षपदासाठी लढणार आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या समावेशामुळे या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे.
उपसमित्यांच्या नोंदीनुसार मफतलाल, गोल्डन टोबॅको आणि इंडो बर्मन पेट्रोलियम या कंपन्या बंद झाल्या आहेत. याचप्रमाणे डीएमसी, जेके आणि रेप्टाकोस या कंपन्यांनी आपल्याकडील क्रिकेटविषयक उपक्रम स्थगित केले आहेत. इंडियन एअरलाइन्सचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाले आहे.
एमसीएची मतदार यादी सदोष – रवी मांद्रेकर
राजकीय व्यक्तींमुळे चर्चेत असलेली मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) द्वैवार्षिक निवडणूक समोर आली असताना मतदार यादी सदोष असल्याचा दावा माजी पदाधिकारी रवी मांद्रेकर यांनी केला आहे.
First published on: 16-06-2015 at 12:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mca voter lists defective