भारत आणि इंग्लंड यांच्यात २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा सत्कार केला जाणार आहे. ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ वर्षे देशाचे प्रतिनिधित्व केल्याप्रकरणी तसेच १०० शतके झळकावल्याप्रकरणी सचिनचा गौरव केला जाणार आहे. तर सेहवागला १०० कसोटी सामने खेळल्यानिमित्त सन्मानित करण्यात येईल,’’ असे एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले. या दोघांनाही चांदीचे स्मृतिचिन्ह देऊन वानखेडे स्टेडियमवर गौरवण्यात येणार आहे.     

Story img Loader