क्रिकेट खेळात अनेक बदल होत असतात. कसोटीनंतर एकदिवसीय सामने आले. त्यानंतर त्यात टी २० ची भर पडली. कसोटीही दिवस-रात्र झाली. लाल, पांढऱ्या चेंडूनंतर गुलाबी चेंडूची भर पडली. खेळाडूसाठी डीआरएस सिस्टम आली. आता मेरिलेबॉन क्रिकेट क्लबने (एमसीसीने) एक मोठी घोषणा केली आहे. क्रिकेट नियमात बदल करत बॅट्समन ऐवजी जेंडर न्यूट्रल टर्मनुसार बॅटर किंवा बॅटर्स संबोधलं जाणार आहे. या बदलला एमसीसीने मान्यता दिली आहे. यापूर्वी क्लबच्या विशेष लॉ सब कमिटीने यावर निर्णय घेतला होता. बॅटर हा शब्द सर्वसमावेशक असल्याने क्रिकेटची स्थिती बदलेल, असं एमसीसीकडून सांगण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“एमसीसीला वाटतं की जेंडर न्यूट्रल शब्दाचा वापर केल्याने क्रिकेट सर्वसमावेशक होईल. हे पाऊल त्या दिशेनं आहे. यामुळे खेळाप्रती क्रीडारसिकांची भावना आणखी जोडली जाईल.”, असं एमसीसीचे सहाय्यक सचिव एमी कॉक्स यांनी सांगितलं. तर फिल्डर आणि बॉलर या शब्दावर कोणतीच आपत्ती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मान्यतेनंतर lords.org/laws यावर हा बदल प्रकाशित करण्यात आला आहे. काही सरकारी संस्था आणि मीडिया संस्था आधीच वृत्तांकन करताना बॅटर हा शब्द वापरत आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने २०१७ मध्ये कायद्यांमध्ये बदल करताना महिला क्रिकेट फलंदाजांना काय संबोधलं जावं हा प्रश्न उपस्थित केला होता. यासाठी महिला क्रिकेटमधील प्रमुख व्यक्तींशी सल्लामसलत करण्यात आली होती. तेव्हा बॅट्समन हा शब्द कायम ठेवण्यात आला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mcc to use gender neutral term batters instead of batsmen rmt
Show comments