ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राचा मानाच्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात येणार आहे. ४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका कसोटीदरम्यान मॅक्ग्राला औपचारिकरीत्या सन्मानित करण्यात येईल. १२४ कसोटींत मॅक्ग्राने ५६३ बळी घेतले आहेत. २५० एकदिवसीय सामन्यांत २२.०२च्या सरासरीने ३८१ बळी टिपले आहेत. १९९९, २००३ आणि २००७ अशा सलग तीन विश्वचषकविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा मॅक्ग्रा अविभाज्य घटक होता.

Story img Loader