Mehidy Hasan Miraj Creates History in WTC 2023-25: बांगलादेश संघ सध्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे, त्यातील पहिला सामना ढाकाच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेश संघ तिसऱ्या दिवशी लंच टाइमपर्यंत फार मजबूत स्थितीत नव्हता. मात्र, असे असतानाही त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराजने मोठी कामगिरी केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात मेहदीने आपल्या अष्टपैलू कामगिरीसह मोठा पराक्रम आपल्या नावे केला आहे, ज्यामुळे तो आता बेन स्टोक्स आणि रवींद्र जडेजा यांच्यासह एका खास क्लबमध्ये सामील झाला आहे.

हेही वाचा – VIDEO: नवा विश्वविक्रम! न्यूझीलंडच्या खेळाडूने फक्त इतक्या चेंडूत झळकावले सर्वात जलद द्विशतक

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : ‘केसरी’च्या बातमीबद्दल शंकेस वाव
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
delhi high court slammed aap government over cag bjp criticizes after court comment
‘कॅग’वरून ‘आप’ सरकारवर ताशेरे ; उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर भाजपची टीका
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा

मेहदी हसन मिराज आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात बॅटने ५०० हून अधिक धावा करणारा आणि WTC च्या एका सायकलमध्ये ३० विकेट घेणारा तिसरा खेळाडू बनला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या २०२३-२५ मध्ये ही कामगिरी करणारा मेहदी हा पहिला खेळाडू आहे. मेहदीने आतापर्यंत ३० विकेट्ससह ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. डब्ल्यूटीसीच्या इतिहासात, त्याच्या आधी फक्त २ खेळाडूंना ही कामगिरी करता आली होती, ज्यामध्ये बेन स्टोक्सने दोनदा आणि रवींद्र जडेजाने तीनदा ही कामगिरी केली होती.

हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्माची स्वाक्षरी घेतल्यावर चाहतीचा विराटसाठी खास संदेश, विनंती ऐकताच कर्णधाराने…, VIDEO मध्ये पाहा काय घडलं?

WTC च्या इतिहासात एका चक्रात ५०० धावा आणि ३० विकेट घेणारे खेळाडू

बेन स्टोक्स (इंग्लंड) – १३३४ धावा आणि ३४ विकेट्स (WTC 2019-21)
रवींद्र जडेजा (भारत) – ७२१ धावा आणि ४७ विकेट्स (WTC 2021-23)
बेन स्टोक्स (इंग्लंड) – ९७१ धावा आणि ३० विकेट्स (WTC 2021-23)
मेहदी हसन मिराज (बांगलादेश) – ५१२ धावा आणि ३४ विकेट्स (WTC 2023-25)

मेहदी हसन मिराजने WTC मध्ये आतापर्यंत बांगलादेश संघासाठी सर्वात चांगली कामगिरी केली आहे, ज्यामध्ये तो या चक्रात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे आणि त्याने चेंडूसह सर्वाधिक विकेट्सही घेतल्या आहेत.

Story img Loader