बुधावारी भारत आणि बांगलादेश संघांत तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने भारताचा ५ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. या विजयात दमदार नाबाद शतकी खेळी करणाऱ्या मेहदी हसन मिराजचे योगदान मोलाचे ठरले. सामन्यानंतर बोलताना मेहदी हसन मिराजने महत्वाची प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराजने भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. हसनने ८३ चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०० धावा केल्या. त्याचबरोबर मेहदी हसनने अनुभवी महमुदुल्लाह (७७) याच्यासोबत सातव्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी करून बांगलादेशच्या डावाला कलाटणी दिली.

मेहदी हसन म्हणाला, ”आमच्या मनात लक्ष्य निश्चित नव्हते. आम्ही ६ विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे विचार हाच होता की किती धावा करू शकू? आम्ही एका वेळी एक चेंडू खेळत होतो. आम्ही लहान भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आणि लक्ष्य निश्चित करण्याचा विचार केला नाही. आम्ही परिस्थितीनुसार खेळलो आणि सतत एकमेकांशी बोलत होतो.”

हसनने सांगितले की, वरिष्ठ असूनही महमुदुल्लाह त्याचे ऐकत होता. मेहदी हसन म्हणाला, ”मला हे आवडले की, वरिष्ठ असूनही त्यांनी माझा आदर केला. जेव्हा मी निदर्शनास आणून दिले की ते गडबड करत आहेत, तेव्हा त्यांनी माझे ऐकले. मी त्यांनी बर्‍याच वेळा सांगितले की आक्रमण करू नका आणि खेळ खोलवर नेऊ. आमच्या भागीदारीत छोट्या छोट्या गोष्टींनी खूप मदत केली.”

आपल्या शतकाविषयी बोलताना मेहदी हसन म्हणाला, ” वनडे क्रिकेटमध्ये सामन्यात पहिले शतक झळकावणं, हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे. हा खास क्षण मी कधीच विसरणार नाही. आम्ही अडचणीत होतो. भाई महमुदुल्लाहसोबतची माझी भागीदारी महत्त्वाची होती. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण भारत हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. मोठ्या संघाविरुद्ध चांगली कामगिरी करणे नेहमीच चांगले असते. भारताविरुद्धची दुसरी वनडे मालिका आम्ही जिंकली. मी चांगले कामगीरी करण्यासाठी कोणतीही योजना आखली नव्हती. नशिबाची साथ मिळाली.”

हेही वाचा – IND vs BAN: रोहितने दमदार खेळीने रचला मोठा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसराच खेळाडू

तो पुढे म्हणाला, ”मला कधीच विश्वास नव्हता की, मी शतक करू शकेन. मी संघाकडून खेळत होतो आणि लयीत होतो. मला पूर्ण 50 षटके खेळायची होती आणि २४०-२५० धावांची आशा होती, ज्याचा पाठलाग करणे भारतासाठी कठीण होईल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mehidy hasan miraz reveals how small things could defeat india in ind vs ban 2nd odi match vbm