भुवनेश्वर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
hockey world cup 2023 भारतीय संघ विश्वचषक हॉकी स्पर्धेत दोन सामन्यानंतर अपराजित असला, तरी थेट उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी भारताला गुरुवारी वेल्सविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे.
ड-गटात भारत आणि इंग्लंड या दोन संघांचे समान चार गुण आहेत. गोल फरकाच्या बाबतीत इंग्लंड आघाडीवर आहे. इंग्लंडचा गोलफरक ५, तर भारताचा २ आहे. इंग्लंडचा सामना गुरुवारी स्पेनशी होणार आहे. इंग्लंडला स्पेनविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले किंवा पराभव पत्करावा लागला, तर भारताला गटात अव्वल स्थान मिळवण्यासाठी वेल्सविरुद्ध केवळ विजय आवश्यक असेल. मात्र, इंग्लंडने स्पेनला नमवल्यास भारताला वेल्सवर किमान पाच गोलच्या फरकाने विजय मिळवावा लागेल.
दोन्ही संघांचे समान गुण आणि समान विजय असल्यास गटातील गोल फरकाच्या सरासरीवर संघांचे अंतिम स्थान निश्चित होणार आहे. परंतु दुसऱ्या स्थानावर राहिल्यानंतरही भारताचे आव्हान संपुष्टात येणार नाही.
वेळ : सायं. ७ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस २