भारताच्या पुरूष हॉकी संघाने दक्षिण कोरियावर मात करत आशियाई स्पर्धेत तब्बल बारा वर्षांनंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मंगळवारी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने यजमान दक्षिण कोरियाचा १-० ने पराभव केला आहे. भारताकडून आकाशदिप सिंगने सामन्याच्या ४४ व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदविला आणि संघाचा विजय निश्चित केला. भारताचा अंतिम फेरीत पाकिस्तान आणि मलेशिया यांच्यातील विजय संघाशी सामना होणार आहे.
यापूर्वी भारतीय संघाने २००२ मध्ये आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर, त्याआधी १९९८ साली भारताने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. दुसऱीकडे बॉक्सिंगमध्ये मेरी कोमने अंतिम फेरीत धडक मारून सुवर्णपदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. तर, ५७ ते ६० किलो वजनी गटात भारताच्या सरितादेवीला पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
बारा वर्षांनंतर भारतीय हॉकी संघ अंतिम फेरीत
भारताच्या पुरूष हॉकी संघाने दक्षिण कोरियावर मात करत आशियाई स्पर्धेत तब्बल बारा वर्षांनंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

First published on: 30-09-2014 at 05:59 IST
TOPICSभारतीय हॉकी
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mens hockey team enter gold medal rounds