लिओनेल मेस्सीने केलेल्या ३२व्या हॅट्ट्रिकच्या बळावर बार्सिलोनाने ६-१ अशा दणदणीत फरकाने रायो व्ॉलेसानो संघाचा धुव्वा उडवला आणि ला लीगा स्पध्रेत अव्वल स्थान काबीज केल़े या विजयाबरोबर बार्सिलोनाच्या खात्यात ६२ गुण जमा झाले आहेत़ रिआल माद्रिद ६१ गुणांसह दुसऱ्या, तर अॅटलेटिको दी माद्रिद ५५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत़
सामन्याच्या सुरुवातीपासूनच बार्सिलोनाचे वर्चस्व जाणवल़े सामन्याच्या पाचव्या मिनिटाला झाव्हीकडून मिळालेल्या पासवर लुईल सुआरेजने पहिला गोल करून बार्सिलोनाचे खाते उघडल़े मात्र, रायो व्ॉलेसानो संघाने त्यानंतर बचाव इतका भक्कम केला की, बार्सिलोनाला मध्यांतरापर्यंत केवळ एका गोलवरच समाधान मानावे लागल़े मध्यांतरानंतर बार्सिलोनाने अधिक आक्रमक खेळ करून व्ॉलेसानोचा बचाव भेदला़ ४६व्या मिनिटाला झाव्हीने कॉर्नरवरून टोलावलेला चेंडू जॉर्डी अल्बाने हेडरद्वारे गोलपोस्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चेंडू गोलपोस्टवर आदळून माघारी फिरला आणि गेरार्ड पिक्युएने तो पुन्हा गोलमध्ये रूपांतरित केला़
बार्सिलोनाकडे या गोलमुळे २-० अशी आघाडी होती़ ५६ व्या मिनिटाला मेस्सीचा धमाका सुरू झाला़ मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर करून मेस्सीने ला लीगा स्पध्रेतील २८वा गोल नोंदविला़ अवघ्या तीन मिनिटांच्या कालावधीत पुन्हा मेस्सीचा जलवा पाहायला मिळाला़ गोलपोस्टनजीक सुआरेजने अगदी हलका स्पर्श करून चेंडू पुढे ढकलला़ अल्वारेज पॅरिस चेंडूवर ताबा मिळवण्यापूर्वीच मेस्सीने गोलीला चकवून दुसरा गोल केला़ हा धडाका कायम राखत मेस्सीने ६८व्या मिनिटाला आपली हॅट् ट्रिक पूर्ण केली़ सामन्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले होत़े मात्र, ८१व्या मिनिटाला रायो व्ॉलेसानो संघाकडून अलबटरे बुएनोने पहिल्या गोलची नोंद करून ही आघाडी थोडी कमी करण्याचा प्रयत्न केला़ अतिरिक्त वेळेत सुआरेजने सामन्यातील दुसरा गोल नोंदवून बार्सिलोनाच्या विजयावर ६-१ अशी शिक्कामोर्तब केली़
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा