गेल्या वर्षांत सर्वाधिक गोल झळकावण्याचा विक्रम नावावर करणारा लिओनेल मेस्सी सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूसाठीचा ‘बलून डि’ओर’ पुरस्कार सोमवारी प्राप्त करण्यासाठी सज्ज झाला आहे.
सलग चौथ्यांदा हा मानाचा पुरस्कार पटकावणारा मेस्सी हा पहिलाच फुटबॉलपटू ठरणार आहे. यंदा या पुरस्कारासाठी मेस्सीचेच नाव आघाडीवर असले तरी बार्सिलोना संघातील त्याचा सहकारी आंद्रेस इनेस्टा आणि रिअल माद्रिदचा ख्रिस्तियानो रोनाल्डो शर्यतीत आहेत.
ला लिगा स्पर्धेत मेस्सीने तब्बल २५ गोल केले, तर २०१२ वर्षांत ९१ गोल झळकावत गर्ड म्युलरचा एका वर्षांत सर्वाधिक गोल झळकावण्याचा विक्रम त्याने मोडला.
‘‘गोल झळकावता आले ही चांगली गोष्ट आहे, मात्र संघाचा विजय महत्त्वाचा आहे. बार्सिलोनाचा संघ ला लिगा स्पर्धेचे जेतेपद पटकावू शकला नाही तर या गोलांना अर्थ नसेल. वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाने जेतेपद पटकावणे हे अधिक महत्त्वाचे आहे,’’ असे मेस्सीने यावेळी सांगितले. मेस्सी आणि फ्रान्सचा मिचेल प्लॅटिनी यांनी तीन वेळा या पुरस्कारावर नाव कोरले आहे.

Story img Loader