अर्जेटिनाचा नवख्या बोस्निया आणि हर्जेगोव्हिनाशी सामना
लिनोनेल मेस्सी.. फुटबॉल जगतातले सध्याच्या घडीला अव्वल खेळाडूंपैकी एक नाव, गगनभरारी घेणारे, प्रतिस्पध्र्यालाही आपल्या खेळाच्या नजाकतीने प्रेमात पाडणारे, आणि अर्जेटिनाचा एकमेव हुकमी एक्का, अशी त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. आतापर्यंत बऱ्याच क्लब सामन्यांमध्ये मेस्सीने पराक्रम दाखवला असला तरी त्याला देशासाठी विश्वचषकामध्ये खेळताना आपले नाणे खणखणीत वाजवता आलेले नाही. त्यामुळेच गेल्या दोन विश्वचषकामध्ये अर्जेटिनाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या विश्वचषकात ‘मेस्सी का जादू चलेगा क्या?’ याची उत्सुकता क्रीडा जगताला असेल. अर्जेटिनाचा विश्वचषकातील पहिला सामना बोस्निया आणि हर्जेगोव्हिना या कमकुवत समजल्या जाणाऱ्या संघाशी आहे. त्यामुळे अर्जेटिना विजयी सलामी देणार, हे जवळपास निश्चित असले तरी मेस्सी कशी कामगिरी करतो, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल.
अर्जेटिनाचा संघ चांगल्या फॉर्मात आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये अर्जेटिना आपले नाव टिकवू शकलेला नाही. २००६ आणि २०१०मध्ये अर्जेटिनाच्या संघाला उतरती कळा लागली होती. २००६च्या विश्वचषकात मेस्सीने बोस्नियाविरुद्ध गोल केला होता, तर २०१०मध्ये दिएगो मॅरेडोना यांच्या मार्गदर्शनाखाली मेस्सीचा खेळ बहरलाच नव्हता. ही सर्व कसर मेस्सी या विश्वचषकामध्ये भरून काढेल, असे बऱ्याच जणांना वाटते आहे. प्रशिक्षक अलेजांड्रो साबेला यांनी मेस्सीसाठी खास रणनीती आखली असल्याचे म्हटले जात आहे. ४-१-३-२ या व्यूहरचनेनुसार या वेळी अर्जेटिनाचा संघ मैदानात उतरणार आहे. अर्जेटिना हा एका मेस्सीवर अवलंबून असल्याचे म्हटले जात असले तरी त्यांच्या संघामध्ये बरेच गुणवान खेळाडू असल्याचे म्हटले जात आहे.
दुसरीकडे बोस्नियाचा संघ नवखा असला तरी संघामध्ये चांगली गुणवत्ता नक्कीच आहे. पण त्यांची गुणवत्ता अर्जेटिनाला धक्का देण्याइतपत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अर्जेटिनासाठी बोस्नियाचा पहिला पेपर सोपा असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामना क्र. ११
‘फ’ गट : अर्जेटिना वि. बोस्निया आणि हर्जेगोव्हिना
स्थळ : इस्टाडिओ माराकाना, रिओ दी जानिरो
लक्षवेधी खेळाडू
लिओनेल मेस्सी (अर्जेटिना) : फुटबॉल जगतामध्ये आपल्या जादूई खेळाने छाप पाडणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणजे लिओनेल मेस्सी. चपळ, संयत, शांतचित्ताने आक्रमण करणारा फुटबॉलपटू अशी मेस्सीची ख्याती आहे. अर्जेटिनाचा सर्वोत्तम खेळाडू समजल्या जाणाऱ्या मेस्सीला विश्वचषकात धमाकेदार कामगिरी करता आलेली नाही. मेस्सी जशी कामगिरी लीगमध्ये करतो, तशीच त्याला यंदाच्या विश्वचषकात करता येईल का, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल.

इडिन झेको(बोस्निया) : बोस्नियाचा संघ नवखा समजला जात असला तरी संघातील खेळाडू मात्र नवे नाहीत. इडिन झेको हा बोस्नियाचा सर्वाधिक गोल करणारा आक्रमणपटू ठरला आहे, त्याचबरोबर या वर्षीचा बोस्नियाचा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मानही त्याने मिळवला आहे. क्लब आणि लीगचे सामने खेळताना झेकोने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. पण विश्वचषकाच्या दडपणपूर्ण सामन्यामध्ये झेको कशी कामगिरी करतो, हे पाहावे लागेल.

व्यूहरचना
प्रतिक्रिया
अर्जेटिनाचा संघ फक्त आणि फक्त माझ्यावर अवलंबून आहे, असे मला वाटत नाही. संघामध्ये खेळाडूंचा चांगला समन्वय आहे. संघातील बऱ्याच खेळाडूंना दमदार कामगिरी करीत स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे सांघिक कामगिरीच्या जोरावर विश्वचषकाला गवसणी घालण्याचे आमचे ध्येय आहे.
– लिओनेल मेस्सी (अर्जेटिना)

अर्जेटिनाविरुद्ध खेळताना आम्हाला बरीच खबरदारी घ्यावी लागणार आहे. मेस्सी हा दादा खेळाडू आहे. तो खेळाडू म्हणून मोठा असला तरी तो आमचा प्रतिस्पर्धी आहे. मेस्सी आणि अर्जेटिनाला थोपवण्यासाठी आम्ही खास रणनीती आखली आहे, फक्त त्याची अंमलबजावणी व्हायला हवी.
साफेट सुसिक (बोस्निया)