ला लीगा, चॅम्पियन्स लीग या स्पर्धामध्ये बार्सिलोना संघाचे नाणे सध्या चांगलेच खणखणत आहे. संघाच्या विजयात सांघिक खेळाला जितके महत्त्व, तितकेच आघाडीपटूंनाही आहे. आघाडीपटू आक्रमक आणि चतुर असलेल्या संघाला प्रतिस्पर्धीची बचावफळी भेदणे सहज शक्य होते. हेच तंत्र बार्सिलोनाने गेली कित्येक वर्षे वापरले. त्यामुळेच त्यांची सवरेत्कृष्ट आघाडीपटूंची फळी कोणती हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या त्यांच्याकडे लिओनेल
मेस्सी, नेयमार आणि लुईस सुआरेज या दक्षिण अमेरिकन आघाडीपटूंची फळी असून या तिघांनी मिळून यंदाच्या वर्षांमध्ये ९७ गोल लगावण्याची किमया साधली आहे.
बार्सिलोनाकडून सर्वाधिक गोल्स करण्याच्या आघाडीपटूंच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावण्यासाठी मेस्सी-नेयमार-सुआरेजला केवळ तीन गोल्सची आवश्यकता आहे. २०१४-१५ या हंगामात या तिघांनी मिळून ९७ गोल्सची नोंद केली आहे. बार्सिलोनाकडून २००८-०९ या हंगामात मेस्सी-थिएरी हेनरी-सॅम्युअल्स इटोस यांच्या ९९ गोल्सचा विक्रम मोडण्याची संधी या त्रिकुटांना आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा