ब्राझील आणि तेथील समुद्रकिनारे आणि फुटबॉल यांचे नाते अतूट असे आहे. ब्राझीलच्या समुद्रकिनाऱ्यांवर जाऊन आनंदात काही क्षण घालवायचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो. मेक्सिकोच्या संघालाही हा मोह आवरता आला नाही. ब्राझीलविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवल्यावर मेक्सिकोच्या संघाला बुधवारी सुट्टी देण्यात आली होती. मेक्सिकोच्या खेळाडूंनी समुद्रकिनारी जाऊन फुटबॉल खेळण्याचा यथेच्छ आनंद लुटला.
मेक्सिकोचे पहिले दोन्ही सामने चुरशीचे झाले. पहिल्या सामन्यात त्यांनी कॅमेरूनवर १-० असा विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात ब्राझीलशी बरोबरी साधली. तिसऱ्या सामन्यामध्ये क्रोएशियाशी दोन हात करण्यापूर्वी खेळाडूंना सुट्टी देण्याचा निर्णय मेक्सिकोच्या संघ व्यवस्थापनाने घेतला. त्यामुळे जेव्हियर हेर्नाडेझ, हेक्टर हेरेना, दिएगो रेयेस, अलान पुलीडो, मार्को फॅबियन यांनी समुद्रकिनाऱ्यावर फुटबॉलची लज्जत लुटली आणि त्यानंतर चाहत्यांना स्वाक्षऱ्या आणि छायाचित्रे काढू दिली.
रुपेरी वाळूत माडाच्या वनात खेळ ना?
ब्राझील आणि तेथील समुद्रकिनारे आणि फुटबॉल यांचे नाते अतूट असे आहे. ब्राझीलच्या समुद्रकिनाऱ्यांवर जाऊन आनंदात काही क्षण घालवायचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-06-2014 at 06:04 IST
TOPICSमेक्सिको
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mexico football players spend time at seashore