मुंबई इंडियन्सने रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा ९ धावांनी दणदणीत पराभव करत विजय मिळवला. मुंबईच्या संपूर्ण संघाने विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली. हरमनप्रीत कौरने शानदार अर्धशतक झळकावले तर अमेलिया करने ३ विकेट्स घेतले. हॅली मॅथ्यूजने अखेरच्या षटकात १२ धावांचा बचाव करत उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि विकेटही घेतली.

मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स यांच्यात एक रोमहर्षक सामना खेळवला गेला. भारती फुलमालीने गुजरातकडून २५ चेंडूत ४ षटकार आणि ८ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली. मुंबईने गुजरातला विजयसाठी १८० धावांचे लक्ष्य दिले होते. पण प्रत्युत्तरात गुजरातच्या संघाने एकामागोमाग एक सर्व मोठे विकेट्स गमावले. पण भारतीय खेळाडू भारती फुलमालीने वादळी खेळी करत मुंबईला विजयासाठी मोठे मेहनत करायला लावली. सिमरन शेखनेही भारतीला चांगली साथ दिली.

गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकाच्या जोरावर १७९ धावा केल्या. मुंबईकडून नवी सलामी जोडी हिली मॅथ्यूज आणि अमेलिया कर लवकर बाद झाले. कर ५ धावा करत हिली २५ धावा करत बाद झाली. तर फॉर्मात असलेल्या नॅट स्किव्हर ब्रंट आणि हरमनप्रीत कौरने यांनी अर्धशतकी भागीदारी केली. नॅट ६ चौकारांसह ३८ धावा करत हरमनप्रीत ३३ चेंडूत ९ चौकारांसह ५४ धावा करत बाद झाली. यानंतर अमनजोत कौरने २७ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर सजना सजीवनने २२ आणि यस्तिका भाटियाने १३ धावांची शानदार खेळी केली आणि संघाला १७९ धावांपर्यंत नेले.

मुंबईने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने ४१ धावांवर ३ विकेट गमावले. हरलीन देओल २४ धावा, फिबी लिचफिल्ड २२ धावा आणि भारती फुलमालीने ६१ धावा केल्या. याशिवाय कोणताच फलंदाज २० धावांचा आकडा गाठू शकला नाही. मुंबईकडून हिली मॅथ्यूज आणि अमलिया कर यांनी ३-३ विकेट्स तर शबनम इस्माईल २ व संस्कृतीच्या नावे १ विकेट आहे.

वुमन्स प्रीमियर लीग २०२५ चे अखेरचे दोन सामने खेळवले जात आहेत. मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर म्हणजेच ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमवर मुंबई अखेरचे दोन सामने खेळत आहे. मुंबईचा पुढचा सामना उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध होणार आहे.

Story img Loader