आयपीएल २०२१ च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाची चव चाखावी लागली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर दोन गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा १९ धावा करून धावचीत झाला. असं असलं तरी रोहित शर्मानं ट्वीट केलेल्या फोटोमुळे त्याचं कौतुक होत आहे. या सामन्यात रोहित शर्मा खास बुटं घालून मैदानात उतरला होता.

एक शिंग असलेली गेंड्याच्या प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.या गेंड्याच्या प्रजाती वाचवण्यासाठी रोहित शर्माने पुढाकार घेतला आहे. ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात रोहितने घातलेल्या बुटावर एक शिंग असलेल्या गेंड्याचा फोटो आहे. तसेच गेंड्यांना वाचवा असा संदेशही त्यावर लिहिण्यात आला आहे. रोहित शर्माने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे.

‘आरसीबीविरोधात जेव्हा मैदानात खेळण्यासाठी उतरलो. तेव्हा तो माझ्यासाठी एक सामना नव्हता. क्रिकेट खेळणं हे माझं कायमच स्वप्न राहिलं आहे. तर दूसरीकडे जगात राहण्यासाठी आणि राहण्यालायक ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. मी त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. ही बाब मी खास पद्धतीने मैदानात घेऊन आलो. जे माझ्या हृदयाजवळ आहे आणि त्यासाठी प्रत्येक पाऊल महत्त्वाचं आहे.’ अशी माहिती रोहितने फोटोसोबत लिहिली आहे.

विराटचा विश्वविक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच कर्णधार

रोहित शर्मा डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया आणि अॅनिमल प्लॅनेट यांच्यासोबत एक शिंग असलेल्या गेंड्यांना वाचवण्यासाठी जनजागृती करत आहे. ‘रोहित4रायनोज’ असं या अभियानाचं नाव आहे. हे अभियान २२ सप्टेंबरला सुरु करण्यात आलं आहे.

क्रिकेकटच्या इतिहासातील सर्वात कमी गतीने टाकलेला चेंडू पाहायचाय का?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याच्या पदरी निराशा पडली. १९ धावांवर असताना रोहित शर्मा धावचीत झाला आणि संघाला २० षटकात ९ गडी गमवून १५९ धावा करता आल्या. आयपीएलच्या संपूर्ण कारकिर्दीत आघाडीच्या सामन्यात मुंबईचा हा सलग ९ वा पराभव आहे. आता मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना कोलकाता नाईट राईडर्ससोबत १३ एप्रिलला आहे.

Story img Loader