MI Emirates beat Dubai Capitals by 35 runs : मुंबई इंडियन्सचा दबदबा केवळ आयपीएलमध्येच नाही तर इतर लीगमध्येही कायम आहे. मुंबईने पुन्हा एकदा चमत्कार केला आहे. मुंबई फ्रँचायझी आयएल ट्वेन्टी-२० मध्येही चॅम्पियन बनली आहे. मुंबई फ्रँचायझीची ही दहावी ट्रॉफी आहे. सोशल मीडियावर पुन्हा एकदा मुंबई पलटणचा आवाज घुमू लागला आहे. मुंबईने दुबई कॅपिटल्सचा ४५ धावांनी पराभव करत ट्रॉफी जिंकली. या सामन्यात निकोलस पूरनने अप्रतिम कामगिरी केली. यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला आहे.
दुबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला होता निर्णय –
आयएल ट्वेन्टी-२० अंतिम सामना १७ फेब्रुवारी रोजी रात्री पार पडला. हा शानदार सामना दुबईच्या मैदानावर खेळला गेला. एमआय एमिरेट्स आणि दुबई कॅपिटल्स ट्रॉफी जिंकण्यासाठी आमनेसामने होते. या सामन्यात दुबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई संघाने अवघ्या ३ विकेट्सच्या मोबदल्यात २०८ धावा केल्या. मुंबई संघ नेहमीच धोकादायक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएल असो, डब्ल्यूपीएल असो की आयएलटी २०, मुंबई संघाची ओळख ही त्याची स्फोटक शैली आहे.
निकोलस पूरन ठरला सामनावीर –
मुंबईने हीच शैली आयएल ट्वेन्टी-२० च्या फायनलमध्ये स्वीकारली आणि धावफलकावर २०० हून अधिक धावा केल्या. मुंबईसाठी निकोलस पुरनने अवघ्या २७ चेंडूत ५७ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून २ चौकार आणि ६ षटकारही पाहिला मिळाले. याशिवाय दुसरा खेळाडू आंद्रे फ्लेचरनेही अर्धशतकी खेळी खेळली. त्याने ३७ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी साकारली. अशा प्रकारे संघाची धावसंख्या २०० पार झाली. आता दुबईला सामना आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी १२० चेंडूत २०९ धावा करायच्या होत्या.
हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! रविचंद्रन अश्विन आज पुन्हा भारतीय संघात सामील होणार
दुबई कॅपिटल्सचा डाव १६७ धावांवर गडगडला –
दुबई कॅपिटल्सचा डाव सुरुवातीपासूनच डळमळीत दिसत होता. दुबईने धावांचे खाते उघडण्यापूर्वीच आपली पहिली विकेट गमावली. दुबईकडून एकाही फलंदाजाने अर्धशतकी खेळी खेळली नाही. सॅम बिलिंगने २९ चेंडूत ४० धावांची सर्वाधिक खेळी साकारली. या खेळीत त्याने ३ चौकार आणि २ षटकारही मारले. अशाप्रकारे दुबई संघाला २० षटकांनंतर ७ विकेट गमावून केवळ १६७ धावा करता आल्या. मुंबईसाठी विजयकांत आणि ट्रेंट बोल्ट यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. दोन्ही गोलंदाजांनी २-२ विकेट्स आपल्या नावावर केल्या.