जोशमध्ये खेळताना होश विसरायचा नसतो, दोन्ही संघांमधली खुन्नस, ठस्सन, एकमेकांवर चाल करणारे खेळाडू यामध्ये मैदानातील ज्वर चढलेलाच होता. पण यामध्ये होश कायम ठेवत मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १८७ धावा फटकावल्या, या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १६८ धावा करता आल्या आणि मुंबईने १९ धावांनी विजय मिळवला.
मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने पवन सुयालच्या तिसऱ्या षटकात गेलच्या प्रत्येकी २ चौकार आणि षटकारांसह २८ धावा लूटल्या. अर्धशतकी सलामीनंतर गेल (३८) आणि कोहली (३५) यांनी संघाचा डाव सावरला, पण गेल बाद झाल्यावर बंगळुरूच्या डावाला उतरती कळा लागली आणि ते विजयापासून दूर गेले.
तत्पूर्वी बंगळुरूने नाणेफक जिंकत मुंबईला फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांनी १८७ धावा फटकावल्या. दहाव्या षटकामध्ये मुंबईने ४ फलंदाज गमावत ८४ धावा केल्या होत्या. या स्थितीमध्ये रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांनी संघाला सावरले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६० चेंडूंमध्ये ९७ धावांची भागीदारी रचली. रोहितने वरूण आरोनच्या १९ षटकांत ३ षटकारांसह २४ धावांची लूट करत अर्धशतक साजरे केले, त्याने ३५ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर नाबाद ५९ धावांची अप्रतिम खेळी साकारली. दुसरीकडे बंगळुरूवर खुन्नस काढत पोलार्डने ६ चौकारांच्या जोरावर ४३ धावा फटकावल्या. बंगळुरूने यावेळी २५ अवांतर धावा आंदण दिल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा