Sachin Tendulkar Reacts On Arjun Tendulkar IPL Debut: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या लेकाने दोन वर्ष वाट पाहिल्यावर काल आयपीएलमध्ये दमदार पदार्पण केले. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग-११ मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने आयपीएलच्या १६व्या हंगामातील २२वा सामना खूप खास बनला. भावाचा सामना बघण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित सारा तेंडुलकर पासून ते सचिनच्या असंख्य फॅन्सपर्यंत अनेकांनी अर्जुनचे काल कौतुक केले. या खेळाने व कौतुकाने भारावून गेलेल्या अर्जुनसाठी आता त्याचे बाबा म्हणेजच सचिनने सुद्धा एक सुंदर मॅसेज लिहिलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिनने अर्जुनसाठी केली खास पोस्ट

“अर्जुन, आज तू क्रिकेटपटू म्हणून तुझ्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहेस. तुझा बाबा या नात्याने, तुझ्यावर प्रेम करणारा आणि खेळाडू म्हणून खेळावर उत्कट प्रेम करणाऱ्या मला, माहित आहे की तू खेळाला योग्य तो आदर देत राहशील आणि खेळही तुमच्यावर प्रेम करेल. तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहेस आणि मला खात्री आहे की तू हे करत राहशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. ऑल द बेस्ट!”

MI vs KKR मधील अर्जुनची कामगिरी

मुंबईकडून गोलंदाजी सुरू करण्याची जबाबदारी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनकडे सोपवण्यात आली. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अर्जुनने बॅट चुकवून आऊटसाठी जोरदार अपील केले पण पंचांनी ते नाकारले. यादरम्यान अर्जुनची गोलंदाजी पाहून साराची प्रतिक्रियाही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

दरम्यान, हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. वानखेडे आणि सचिन हे अतूट नातं सगळ्यांनाच माहित आहे. आता याच मैदानावर सचिनच्या लेकालाही करिअरमधील सर्वात मोठी संधी गवसली आहे. दुसरीकडे पहिल्या दोन पराभवानंतर पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतत मुंबईने सलग दुसरा विजय आपल्या नावे केला. व्यंकटेश अय्यरने झळकावलेल्या शतकानंतरही केकेआरला या सामन्यात ५ विकेट्सने पराभूत व्हावे लागले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mi vs kkr arjun tendulkar ipl debut sachin tendulkar writes emotional tweet as father and player ipl 2023 highlights svs
Show comments