आयपीएल २०२१ च्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स भिडत होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघातील ११ खेळाडुंच्या ताफ्यात कोणते खेळाडू असतील याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर कुणाला आराम दिला जाईल याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
गतविजेत्या मुंबई इंडियन्समध्ये कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीकडे लक्ष असणार आहे. तर रोहितला कसं झटपट बाद करता येईल याची रणनिती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आखत आहे. जर रोहित शर्मा अपेक्षित कामगिरी करु शकला नाही, तर मात्र इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोघांना जबाबदारी पार पाडावी लागेल. आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केली तर मात्र अष्टपैलू हार्दीक पंड्या आणि कृणाल पंड्या यांच्यावर मदार असणार आहे. त्याचबरोबर पोलार्डच्या आक्रमक खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचं गणित बिघडू शकतं. तर राहुल चहर आणि ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीकडे लक्ष असणार आहे.
IPL 2021: चेतेश्वर पुजाराला फलंदाजीबाबत ब्रेट लीने दिला सल्ला
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 14.25 कोटी रुपये खर्च करुन ग्लेन मॅक्सवेलला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. न्यूझीलंडच्या जेमिसनलाही १५ कोटी रुपये खर्च करून खरेदी केले आहे. या दोघांची अष्टपैलू कामगिरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं स्वप्न पूर्ण करेल अशी आशा आहे. देवदत्त पडिक्कलही करोनातून नुकताच बरा झाला आहे. मात्र त्याला लगेच संघात स्थान मिळणं कठिण आहे. त्यामुळे यजुवेंद्र चहलला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. गोलंदाजीची मदार मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनीवर असेल.
संघात या ११ खेळाडुंना स्थान मिळण्याची शक्यता
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, ख्रिस लिन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, , क्रुणाल पंड्या, नॅथन कुल्टर-नाईल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह</p>
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद अझरुद्दीन, डॅनियल ख्रिश्चन, काईल जेमीसन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, यजुर्वेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, रजत पाटीदार