MI-W vs DC-W WPL 2025 Final Live Cricket Score Online: वुमन्स प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम फेरीचा सामना मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स या महिला संघांमध्ये खेळवला जात आहे. मुंबई इंडियन्सचा संघ WPL मधील दुसरे जेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने उतरला आहे. तर दिल्लीचा संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळत असून पहिले जेतेपद पटकावणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत. दोन्ही वेळेस दिल्लीचा संघ जेतेपदापासून दूर राहिला आहे, त्यामुळे यंदाचा अंतिम सामना दिल्लीसाठी महत्त्वाचा असणार आहे. दिल्ली संघाचे नेतृत्त्व मेग लॅनिंगकडे आहे तर मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर असेल.
MI-W vs DC-W WPL 2025 Final Live Cricket Score: वुमन्स प्रीमियर लीग २०२५ मधील अंतिम सामना मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जात आहे.
MI vs DC WPL 2025 Final : १६ व्या षटकात १७ धावा
साईका इशाकच्या १६व्या षटकात मारिजन कापने वादळी फलंदाजी करत १७ धावा केल्या. यासह दिल्लीने हा सामना अटीतटीच्या वळणावर आणून ठेवला आहे. दिल्लीला विजयासाठी २४ चेंडूत ३५ धावांची गरज आहे. मैदानावर दिल्लीकडून मारिजन काप आणि निकी प्रसादची जोडी आहे.
MI vs DC WPL 2025 Final : रनआऊट
नताली स्किव्हर ब्रंटच्या १३व्या षटकात दिल्लीने पहिल्या चार चेंडूंवर दहा धावा केल्या असतानाही धाव चोरण्याचा नादात सारा ब्राईस धावबाद झाली. संस्कृती गुप्ताच्या परफेक्ट थ्रोवर मुंबईला सहावी विकेट मिळाली. यासह दिल्लीने १३ षटकांत ६ बाद ८४ धावा केल्या.
MI vs DC WPL 2025 Final : जेमिमा रोड्रिग्ज झेलबाद
अमेलिया करने ११व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोड्रीग्जला गोलंदाजी करत तिला झेलबादही केलं. एका टोकाकडून विकेट्स गमावत असताना जेमिमा चांगली फलंदाजी करत होती. पण अमेलियाने तिला झेलबाद करत संघाला पाचवी विकेट मिळवून दिली. जेमिमा २१ चेंडूत ४ चौकारांसह ३० धावा करत बाद झाली.
MI vs DC WPL 2025 Final : चौथी विकेट
साईका इशाकने आठव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर संघाला चौथी विकेट मिळवून दिली. आपला पाचवा चेंडू खेळत असलेल्या सदरलँडने पुढे जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण ती चेंडू खेळायला चुकली. तितक्यात यस्तिकाने चेंडू टिपत स्टंपिंग केलं आणि चौथी विकेट गमावली. यासह दिल्लीने आठ षटकांत ४ विकेट्स गमावत ४४ धावा केल्या.
MI vs DC WPL 2025 Final : दिल्लीने गमावली तिसरी विकेट
जेस जॉनासनने खराब फटका मारत आपली विकेट गमावली आणि दिल्ली संघाला तिसरा धक्का दिला. अमेलिया करच्या सातव्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत वर उंच गेला आणि यस्तिकाने झेल टिपला.
MI vs DC WPL 2025 Final : शफाली वर्मा पायचीत
शबनम इस्माईलने पुढच्याच म्हणजे तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर शफाली वर्माला पायचीत करत मुंबईला अजू एक मोठी विकेट मिळवून दिली. शफाली वर्मा विस्फोटक फलंदाज आहे हे पाहता तिची विकेट संघासाठी खूप महत्त्वाची होती.
MI vs DC WPL 2025 Final : शफाली वर्मा पायचीत
शबनम इस्माईलने पुढच्याच म्हणजे तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर शफाली वर्माला पायचीत करत मुंबईला अजू एक मोठी विकेट मिळवून दिली. शफाली वर्मा विस्फोटक फलंदाज आहे हे पाहता तिची विकेट संघासाठी खूप महत्त्वाची होती.
नताली स्किव्हर ब्रंटने दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मेग लॅनिंगला क्लीन बोल्ड करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली आहे. मेग लॅनिंग दिल्ली संघाची कर्णधार आहे. लॅनिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत सुरूवात केली होती. लॅनिंग ९ चेंडूत २ चौकारांसह १३ धावा करत बाद झाली.
MI vs DC WPL 2025 Final :दिल्लीच्या डावाला सुरूवात
मुंबई इंडियन्सने दिलेल्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीकडून मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा फलंदाजीसाठी उतरले आहेत. मेग लॅनिंगने चौकारासह सुरूवात केली आहे. तर मुंबईकडून शबनम इस्माईलने गोलंदाजीला सुरूवात केली.
मुंबई इंडियन्सने खराब सुरूवातीनंतर स्पर्धात्मक धावसंख्या उभारली आहे. मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ बाद १४९ धावा केल्या आहेत. अमनजोत कौर आणि संस्कृती गुप्ता यांनी अखेरच्या षटकांमध्ये महत्त्वपूर्ण धावा केल्या. याशिवाय मुंबई १४ धावांवर २ विकेट बाद असताना हरमनप्रीत कौर आणि नॅट स्किव्हर ब्रंटने संघाचा डाव सावरला. नॅट मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. पण हरमनप्रीतने एक कमालीची खेळी करत संघाच्या चांगल्या धावसंख्येचा पाया रचला. हरमनप्रीत कौरने ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६६ धावा केल्या.
MI vs DC WPL 2025 Final : १९व्या षटकात सातवी विकेट
कमालिनीने १९व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत संघाच्या धावसंख्येत भर घातली. पण मोठा फटका खेळण्यासाठी पुढे येऊन खेळल्याने कमालिनी स्टंपिंग झाली.
MI vs DC WPL 2025 Final : हरमनप्रीत कौरच्या रूपात मुंबईला सर्वात मोठा धक्का
१८व्.या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायला गेली आणि हरमनप्रीत कौर सीमारेषेजवळ मारिजन कापकरवी झेलबाद झाली. हरमन ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६६ धावा करत बाद झाली. यासह मुंबई इंडियन्सच्या स्पर्धात्मक धावसंख्येला धक्का बसला आहे.
MI vs DC WPL 2025 Final : एका षटकात दोन विकेट
मुंबई इंडियन्सने १६व्या षटकात दोन विकेट्स गमावल्या आहेत. जेस जोनासनच्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अमेलिया कर झेलबाद झाली. यानंतर षटकातील अखेरच्या चेंडूवर स्विप शॉट मारायला गेली आणि पायचीत झाली यासह मुंबईने १६ षटकांत ५ बाद ११२ धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने १५व्या षटकात तिसरी मोठी विकेट गमावली आहे. हरमनप्रीत कौर आणि नॅट स्किव्हर ब्रंटने संघाचा डाव सावरला होता. पण चरणीच्या षटकातली पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ३० धावांवर झेलबाद झाली. यासह मुंबईने १५ षटकांत ३ बाद १०४ धावा केल्या आहेत.
MI vs DC WPL 2025 Final : कर्णधार हरमनप्रीत कौरचे वादळी अर्धशतक
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने झंझावाती अर्धशतक झळकावत संघाचा डाव सावरला आहे. मुंबईचा संघ २ बाद १४ धावांवर असताना हरमन फलंदाजीला आली आणि सावध फलंदाजी करत सुरूवात केली. संधी मिळताच मोठे फटके मारत हरमनप्रीतने ३३ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. यासह मुंबईने १३ षटकांत २ बाद ८७ धावा केल्या आहेत. तर नॅट स्किव्हर ब्रंटनेही तिला चांगली साथ दिली.
३३ ५० ८ १
नॅट स्किव्हर ब्रंट यंदाच्या वुमन्स प्रीमियर लीग २०२५ मध्ये उत्कृष्ट फॉर्मात आहे. यासह तिने एका सीझनमध्ये ५०० धावांचा टप्पा गाठला आहे. एका सीझनमध्ये ५०० धावा करणारी नॅट स्किव्हर ब्रंट ही वुमन्स प्रीमियर लीगमधील पहिली महिला फलंदाज ठरली आहे. याशिवाय नॅटने वुमन्स प्रीमियर लीगमध्ये १००० धावांचा टप्पा गाठला आहे.
MI vs DC Final : १० षटकांत मुंबईच्या ५० धावा पूर्ण
मुंबई इंडियन्सने संथ सुरूवातीनंतर १० षटकांत ५० धावांचा टप्पा गाठला आहे. हरमनप्रीत कौर आणि नॅट स्किव्हर ब्रंट या दोघांनी संघाचा डाव सावरला. अशारितीने मुंबईने १० षटकांत २ बाद ५३ धावा केल्या आहेत.
MI vs DC Final : मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का
दिल्लीच्या मारिजन कापने यस्तिका भाटियाला झेलबाद करत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. यस्तिका भाटियाने चौकार मारत संघावरचा दबाव कमी केला, पण पुढच्याच चेंडूवर ती झेलबाद झाली.जेमिमा रोड्रिग्जने एक कमालीचा झेल टिपला. यासह मुंबईने ५ षटकांत २ विकेट गमावत १५ धावा केल्या आहेत.
MI vs DC Final : मुंबईची संथ सुरूवात
मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला असला तरी दिल्लीच्या संघाने भेदक गोलंदाजी केली आहे. मुंबईने पहिल्या दोन षटकांत ३ धावा केल्याने दबाव वाढला. अखेर तिसऱ्या षटकात मारिजन कापने हिली मॅथ्यूजला क्लीन बोल्ड करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. यासह मुंबईने ३ षटकांत १ बाद ५ धावा केल्या आहेत.
MI vs DC Final : मुंबई वि. दिल्ली अंतिम सामन्याला सुरूवात
मुंबईचा संघ नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. अंतिम सामन्यात मुंबईकडून हिली मॅथ्यूज आणि यस्तिका भाटियाची जोडी मैदानात आहे. तर दिल्लीकडून मारिजन काप गोलंदाजी करत आहे.
यास्तिका भाटिया (विकेटकिपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीवन सजाना, अमेलिया केर, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक
MI vs DC Final playing XI: दिल्ली कॅपिटल्स महिला प्लेइंग इलेव्हन
मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेस जोनासेन, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, मारिझान कॅप, सारा ब्राइस (विकेटकिपर), निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, नल्लापुरेड्डी चरणी
वुमन्स प्रीमियर लीग २०२५ सामन्याची नाणेफेक दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने संघात एक मोठा बदल केला आहे.
MI vs DC Final: अंतिम सामन्याची नाणेफेक का उशिरा होणार?
WPL 2025 मधील मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्याची नाणेफेक उशिराने होणार आहे. वुमन्स प्रीमियर लीग २०२५ ची क्लोजिंग सेरेमनी सुरू असल्याने नाणेफेक उशिराने होणार आहे.
MI vs DC Final: दोन्ही संघ स्टेडियममध्ये हजर
WPL 2025 च्या अंतिम फेरीसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ स्टेडियममध्ये पोहोचले असून सराव करत आहेत.
मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील वुमन्स प्रीमियर लीग 2025 चा अंतिम सामना सुरू होणार आहे. हा सामना संध्याकाळी ८ वाजता सुरू होणार आहे तर नाणेफेक ७.३० वाजता होईल.
WPL 2024 Final: दिल्ली कॅपिटल्स सलग तिसऱ्या वर्षी फायनलमध्ये
दिल्ली कॅपिटल्सचा संघ वुमन्स प्रीमियर लीग २०२५च्या सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचला आहे. दिल्ली यंदा चांगल्या फॉर्मात असून या संघाने ८ साखळी सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आणि ३ गमावले. हा संघ १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल होता आणि अंतिम फेरीत पोहोचला. दिल्लीचा संघ खूपच मजबूत दिसत असून अंतिम फेरीत मुंबईला कडवी टक्कर देऊ शकतो. दिल्लीला प्रथमच महिला प्रीमियर लीगमध्ये चॅम्पियन बनण्याची मोठी संधी आहे.
WPL 2024 Final: पहिल्याच सीझनमध्ये मुंबई इंडियन्स चॅम्पियन
२०२३ मध्ये महिला प्रीमियर लीगच्या मोसमात चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर २०२४ मध्ये आरसीबीने विजेतेपदावर कब्जा केला. आता मुंबईला पुन्हा दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची मोठी संधी आहे. जर मुंबईने फायनल जिंकली तर हा संघ दोनदा विजेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरेल.
MI vs DC WPL 2025 Final: मुंबई वि. दिल्ली अंतिम सामना
महिला प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. एकीकडे मुंबई फायनल जिंकून दुस-यांदा चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरीकडे दिल्ली पहिल्यांदाच विजेतेपद पटकावण्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न करेल.
MI vs DC Final: मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ
यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हिली मॅथ्यूज, नॅट स्किव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीवन सजना, अमेलिया कर, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, कीर्तन बालाकृष्णन, जिंतीमणी कलिता, पारूनिका सिसोदिया. अमनदीप कौर, अक्षिता महेश्वरी