MI-W vs DC-W WPL 2025 Final Highlights: मुंबई इंडियन्सने वुमन्स प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा ८ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा WPL चे जेतेपद पटकावले. या विजयासह मुंबई इंडियन्स वुमन्स प्रीमियर लीगचे दोन वेळा जेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ सलग तिसऱ्यांदा जेतेपदापासून दूर राहिला आहे. या सामन्यात मुंबईकडून हरमनप्रीत कौरने ६६ धावांची वादळी खेळी करत संघाचा डाव सावरला. तर गोलंदाजीत नॅट स्किव्हर ब्रंटने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले.
MI-W vs DC-W WPL 2025 Final Highlights: वुमन्स प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने बाजी मारत दिल्लीचा पराभव करत जेतेपद पटकावले.
मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हरमनप्रीत कौरला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, बीसीसीआयचे सचिव देवजीत साईकिया यांनी ट्रॉफी दिली. यानंतर संपूर्ण संघाने ट्रॉफीसह जल्लोष केला. तर मुंबई संघाची मालक निता अंबानी यांनी ट्रॉफीसह फोटो घेत मुंबई मुंबईचे नारे दिले.
That Trophy Lifting Moment! ? ?
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2025
?
Mumbai Indians captain Harmanpreet Kaur receives the #TATAWPL Trophy ? from the hands of Mr Roger Binny, President, BCCI and Mr Devajit Saikia, Honorary Secretary, BCCI ? ?#Final | #DCvMI | @lonsaikia | @mipaltan | @ImHarmanpreet pic.twitter.com/amwiH8R3ED
https://twitter.com/MIPaltanFamily/status/1900986393876459655
WPL Final : मुंबई इंडियन्स
कर्णधार हरमनप्रीत कौरला विजेत्या संघाला बक्षिसाची रक्कम ६ कोटी देण्यात आली. यानंतर हरमनप्रीत कौरने सामन्याबाबत माहिती दिली.
WPL Final : दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्स संघाला उपविजेता संघाची ट्रॉफी आणि ३ लाख प्राईज मनी सादर करण्यात आली. संघाच्या वतीने कर्णधार मेग लॅनिंगने ही ट्रॉफी स्वीकारली.
शनेल हेनरी (UPW) – सुपर स्ट्राईकर ऑफ द मॅच
एश्ले गार्डनर (GT) – मोस्ट सिक्सेस ऑफ द सीझन (१८ षटकार)
एनाबेल सदरलँड (DC) – कॅच ऑफ द सीझन
शबनम इस्माईल (MI) – ग्रीन डॉट बॉल्स ऑफ द सीझन (७९५० झाडं)
अमनजोत कौर (MI) – इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन
गुजरात जायंट्स संघ (GT) – फेअरप्ले अवॉर्ड
अमेलिया कर (MI) – पर्पल कॅप विजेती (१८ विकेट्स)
नताली स्किव्हर ब्रंट (MI) – ऑरेंज कॅप विजेती (५२३ धावा)
नताली स्किव्हर ब्रंट (MI) – मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर
मारिजन काप – सुपर स्ट्राईकर ऑफ द मॅच
हरमनप्रीत कौर – सिक्सेस ऑप द मॅच
अमेलिया कर – कॅच ऑफ द मॅच
मारिजन काप- डॉट बॉल्स ऑफ द मॅचट
हरमनप्रीत कौर – प्लेअर ऑफ द मॅच
मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा महिला प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावले आहे. मुंबईने दिल्लीचा ८ धावांनी पराभव करत चॅम्पियन ठरले आहेत.
संपूर्ण सामन्यात काय घडलं? वाचा सविस्तर
मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा ठरला WPL चॅम्पियन, हरमनप्रीत कौरच्या संघाने घडवला इतिहास; दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा
MI vs DC WPL 2025 Final : मिन्नू मणी झेलबाद
हिली मॅथ्यूजच्या १९व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मिन्नू मणी झेलबाद झाली आणि मुंबईने नववी विकेट मिळवली.
MI vs DC WPL 2025 Final : १८व्या षटकात दोन विकेट
नॅट स्किव्हरने १८व्या षटकात चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर दोन विकेट घेत दिल्लीच्या विजयाच्या आशांना धक्का दिला. स्किव्हरने चौथ्या चेंडूवर मारिजन कापला झेलबाद केलं. तर पाचव्या चेंडूवर शिखा पांडेला गोल्डन डकवर क्लीन बोल्ड केलं. यासह दिल्लीला विजयासाठी १२ चेंडूत २३ धावांची गरज आहे.
MI vs DC WPL 2025 Final : १६ व्या षटकात १७ धावा
साईका इशाकच्या १६व्या षटकात मारिजन कापने वादळी फलंदाजी करत १७ धावा केल्या. यासह दिल्लीने हा सामना अटीतटीच्या वळणावर आणून ठेवला आहे. दिल्लीला विजयासाठी २४ चेंडूत ३५ धावांची गरज आहे. मैदानावर दिल्लीकडून मारिजन काप आणि निकी प्रसादची जोडी आहे.
MI vs DC WPL 2025 Final : रनआऊट
नताली स्किव्हर ब्रंटच्या १३व्या षटकात दिल्लीने पहिल्या चार चेंडूंवर दहा धावा केल्या असतानाही धाव चोरण्याचा नादात सारा ब्राईस धावबाद झाली. संस्कृती गुप्ताच्या परफेक्ट थ्रोवर मुंबईला सहावी विकेट मिळाली. यासह दिल्लीने १३ षटकांत ६ बाद ८४ धावा केल्या.
MI vs DC WPL 2025 Final : जेमिमा रोड्रिग्ज झेलबाद
अमेलिया करने ११व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोड्रीग्जला गोलंदाजी करत तिला झेलबादही केलं. एका टोकाकडून विकेट्स गमावत असताना जेमिमा चांगली फलंदाजी करत होती. पण अमेलियाने तिला झेलबाद करत संघाला पाचवी विकेट मिळवून दिली. जेमिमा २१ चेंडूत ४ चौकारांसह ३० धावा करत बाद झाली.
MI vs DC WPL 2025 Final : चौथी विकेट
साईका इशाकने आठव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर संघाला चौथी विकेट मिळवून दिली. आपला पाचवा चेंडू खेळत असलेल्या सदरलँडने पुढे जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण ती चेंडू खेळायला चुकली. तितक्यात यस्तिकाने चेंडू टिपत स्टंपिंग केलं आणि चौथी विकेट गमावली. यासह दिल्लीने आठ षटकांत ४ विकेट्स गमावत ४४ धावा केल्या.
MI vs DC WPL 2025 Final : दिल्लीने गमावली तिसरी विकेट
जेस जॉनासनने खराब फटका मारत आपली विकेट गमावली आणि दिल्ली संघाला तिसरा धक्का दिला. अमेलिया करच्या सातव्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत वर उंच गेला आणि यस्तिकाने झेल टिपला.
MI vs DC WPL 2025 Final : शफाली वर्मा पायचीत
शबनम इस्माईलने पुढच्याच म्हणजे तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर शफाली वर्माला पायचीत करत मुंबईला अजू एक मोठी विकेट मिळवून दिली. शफाली वर्मा विस्फोटक फलंदाज आहे हे पाहता तिची विकेट संघासाठी खूप महत्त्वाची होती.
MI vs DC WPL 2025 Final : शफाली वर्मा पायचीत
शबनम इस्माईलने पुढच्याच म्हणजे तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर शफाली वर्माला पायचीत करत मुंबईला अजू एक मोठी विकेट मिळवून दिली. शफाली वर्मा विस्फोटक फलंदाज आहे हे पाहता तिची विकेट संघासाठी खूप महत्त्वाची होती.
नताली स्किव्हर ब्रंटने दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मेग लॅनिंगला क्लीन बोल्ड करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली आहे. मेग लॅनिंग दिल्ली संघाची कर्णधार आहे. लॅनिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत सुरूवात केली होती. लॅनिंग ९ चेंडूत २ चौकारांसह १३ धावा करत बाद झाली.
MI vs DC WPL 2025 Final :दिल्लीच्या डावाला सुरूवात
मुंबई इंडियन्सने दिलेल्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीकडून मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा फलंदाजीसाठी उतरले आहेत. मेग लॅनिंगने चौकारासह सुरूवात केली आहे. तर मुंबईकडून शबनम इस्माईलने गोलंदाजीला सुरूवात केली.
मुंबई इंडियन्सने खराब सुरूवातीनंतर स्पर्धात्मक धावसंख्या उभारली आहे. मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ बाद १४९ धावा केल्या आहेत. अमनजोत कौर आणि संस्कृती गुप्ता यांनी अखेरच्या षटकांमध्ये महत्त्वपूर्ण धावा केल्या. याशिवाय मुंबई १४ धावांवर २ विकेट बाद असताना हरमनप्रीत कौर आणि नॅट स्किव्हर ब्रंटने संघाचा डाव सावरला. नॅट मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. पण हरमनप्रीतने एक कमालीची खेळी करत संघाच्या चांगल्या धावसंख्येचा पाया रचला. हरमनप्रीत कौरने ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६६ धावा केल्या.
??????? ?
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2025
Harmanpreet Kaur sends that way back into the crowd ?#MI will need plenty more of those ?
Updates ▶ https://t.co/2dFmlnwxVj #TATAWPL | #DCvMI | #Final pic.twitter.com/PkONDkq05Q
MI vs DC WPL 2025 Final : १९व्या षटकात सातवी विकेट
कमालिनीने १९व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत संघाच्या धावसंख्येत भर घातली. पण मोठा फटका खेळण्यासाठी पुढे येऊन खेळल्याने कमालिनी स्टंपिंग झाली.
MI vs DC WPL 2025 Final : हरमनप्रीत कौरच्या रूपात मुंबईला सर्वात मोठा धक्का
१८व्.या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायला गेली आणि हरमनप्रीत कौर सीमारेषेजवळ मारिजन कापकरवी झेलबाद झाली. हरमन ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६६ धावा करत बाद झाली. यासह मुंबई इंडियन्सच्या स्पर्धात्मक धावसंख्येला धक्का बसला आहे.
MI vs DC WPL 2025 Final : एका षटकात दोन विकेट
मुंबई इंडियन्सने १६व्या षटकात दोन विकेट्स गमावल्या आहेत. जेस जोनासनच्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अमेलिया कर झेलबाद झाली. यानंतर षटकातील अखेरच्या चेंडूवर स्विप शॉट मारायला गेली आणि पायचीत झाली यासह मुंबईने १६ षटकांत ५ बाद ११२ धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने १५व्या षटकात तिसरी मोठी विकेट गमावली आहे. हरमनप्रीत कौर आणि नॅट स्किव्हर ब्रंटने संघाचा डाव सावरला होता. पण चरणीच्या षटकातली पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ३० धावांवर झेलबाद झाली. यासह मुंबईने १५ षटकांत ३ बाद १०४ धावा केल्या आहेत.
MI vs DC WPL 2025 Final : कर्णधार हरमनप्रीत कौरचे वादळी अर्धशतक
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने झंझावाती अर्धशतक झळकावत संघाचा डाव सावरला आहे. मुंबईचा संघ २ बाद १४ धावांवर असताना हरमन फलंदाजीला आली आणि सावध फलंदाजी करत सुरूवात केली. संधी मिळताच मोठे फटके मारत हरमनप्रीतने ३३ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. यासह मुंबईने १३ षटकांत २ बाद ८७ धावा केल्या आहेत. तर नॅट स्किव्हर ब्रंटनेही तिला चांगली साथ दिली.
३३ ५० ८ १
नॅट स्किव्हर ब्रंट यंदाच्या वुमन्स प्रीमियर लीग २०२५ मध्ये उत्कृष्ट फॉर्मात आहे. यासह तिने एका सीझनमध्ये ५०० धावांचा टप्पा गाठला आहे. एका सीझनमध्ये ५०० धावा करणारी नॅट स्किव्हर ब्रंट ही वुमन्स प्रीमियर लीगमधील पहिली महिला फलंदाज ठरली आहे. याशिवाय नॅटने वुमन्स प्रीमियर लीगमध्ये १००० धावांचा टप्पा गाठला आहे.
MI vs DC Final : १० षटकांत मुंबईच्या ५० धावा पूर्ण
मुंबई इंडियन्सने संथ सुरूवातीनंतर १० षटकांत ५० धावांचा टप्पा गाठला आहे. हरमनप्रीत कौर आणि नॅट स्किव्हर ब्रंट या दोघांनी संघाचा डाव सावरला. अशारितीने मुंबईने १० षटकांत २ बाद ५३ धावा केल्या आहेत.
MI vs DC Final : मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का
दिल्लीच्या मारिजन कापने यस्तिका भाटियाला झेलबाद करत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. यस्तिका भाटियाने चौकार मारत संघावरचा दबाव कमी केला, पण पुढच्याच चेंडूवर ती झेलबाद झाली.जेमिमा रोड्रिग्जने एक कमालीचा झेल टिपला. यासह मुंबईने ५ षटकांत २ विकेट गमावत १५ धावा केल्या आहेत.
MI vs DC Final : मुंबईची संथ सुरूवात
मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला असला तरी दिल्लीच्या संघाने भेदक गोलंदाजी केली आहे. मुंबईने पहिल्या दोन षटकांत ३ धावा केल्याने दबाव वाढला. अखेर तिसऱ्या षटकात मारिजन कापने हिली मॅथ्यूजला क्लीन बोल्ड करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. यासह मुंबईने ३ षटकांत १ बाद ५ धावा केल्या आहेत.
MI vs DC Final : मुंबई वि. दिल्ली अंतिम सामन्याला सुरूवात
मुंबईचा संघ नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. अंतिम सामन्यात मुंबईकडून हिली मॅथ्यूज आणि यस्तिका भाटियाची जोडी मैदानात आहे. तर दिल्लीकडून मारिजन काप गोलंदाजी करत आहे.
यास्तिका भाटिया (विकेटकिपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीवन सजाना, अमेलिया केर, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक
Our FINAL XI ? #AaliRe #MumbaiIndians #DCvMI #TATAWPL pic.twitter.com/z23SjLKY4q
— Mumbai Indians (@mipaltan) March 15, 2025
MI vs DC Final playing XI: दिल्ली कॅपिटल्स महिला प्लेइंग इलेव्हन
मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेस जोनासेन, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, मारिझान कॅप, सारा ब्राइस (विकेटकिपर), निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, नल्लापुरेड्डी चरणी