MI-W vs DC-W WPL 2025 Final Highlights: मुंबई इंडियन्सने वुमन्स प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा ८ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा WPL चे जेतेपद पटकावले. या विजयासह मुंबई इंडियन्स वुमन्स प्रीमियर लीगचे दोन वेळा जेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ सलग तिसऱ्यांदा जेतेपदापासून दूर राहिला आहे. या सामन्यात मुंबईकडून हरमनप्रीत कौरने ६६ धावांची वादळी खेळी करत संघाचा डाव सावरला. तर गोलंदाजीत नॅट स्किव्हर ब्रंटने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले.

Live Updates

MI-W vs DC-W WPL 2025 Final Highlights: वुमन्स प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने बाजी मारत दिल्लीचा पराभव करत जेतेपद पटकावले.

19:41 (IST) 15 Mar 2025
MI vs DC Final: फायनलची नाणेफेक कोणी जिंकली?

वुमन्स प्रीमियर लीग २०२५ सामन्याची नाणेफेक दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने संघात एक मोठा बदल केला आहे.

19:35 (IST) 15 Mar 2025

MI vs DC Final: अंतिम सामन्याची नाणेफेक का उशिरा होणार?

WPL 2025 मधील मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्याची नाणेफेक उशिराने होणार आहे. वुमन्स प्रीमियर लीग २०२५ ची क्लोजिंग सेरेमनी सुरू असल्याने नाणेफेक उशिराने होणार आहे.

19:14 (IST) 15 Mar 2025

MI vs DC Final: दोन्ही संघ स्टेडियममध्ये हजर

WPL 2025 च्या अंतिम फेरीसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ स्टेडियममध्ये पोहोचले असून सराव करत आहेत.

18:54 (IST) 15 Mar 2025
MI vs DC Final: थोड्याच वेळात होणार नाणेफेक

मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील वुमन्स प्रीमियर लीग 2025 चा अंतिम सामना सुरू होणार आहे. हा सामना संध्याकाळी ८ वाजता सुरू होणार आहे तर नाणेफेक ७.३० वाजता होईल.

18:21 (IST) 15 Mar 2025

WPL 2024 Final: दिल्ली कॅपिटल्स सलग तिसऱ्या वर्षी फायनलमध्ये

दिल्ली कॅपिटल्सचा संघ वुमन्स प्रीमियर लीग २०२५च्या सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचला आहे. दिल्ली यंदा चांगल्या फॉर्मात असून या संघाने ८ साखळी सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आणि ३ गमावले. हा संघ १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल होता आणि अंतिम फेरीत पोहोचला. दिल्लीचा संघ खूपच मजबूत दिसत असून अंतिम फेरीत मुंबईला कडवी टक्कर देऊ शकतो. दिल्लीला प्रथमच महिला प्रीमियर लीगमध्ये चॅम्पियन बनण्याची मोठी संधी आहे.

18:10 (IST) 15 Mar 2025

WPL 2024 Final: पहिल्याच सीझनमध्ये मुंबई इंडियन्स चॅम्पियन

२०२३ मध्ये महिला प्रीमियर लीगच्या मोसमात चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर २०२४ मध्ये आरसीबीने विजेतेपदावर कब्जा केला. आता मुंबईला पुन्हा दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची मोठी संधी आहे. जर मुंबईने फायनल जिंकली तर हा संघ दोनदा विजेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरेल.

17:52 (IST) 15 Mar 2025

MI vs DC WPL 2025 Final: मुंबई वि. दिल्ली अंतिम सामना

महिला प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. एकीकडे मुंबई फायनल जिंकून दुस-यांदा चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरीकडे दिल्ली पहिल्यांदाच विजेतेपद पटकावण्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न करेल.

17:51 (IST) 15 Mar 2025

MI vs DC Final: मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हिली मॅथ्यूज, नॅट स्किव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीवन सजना, अमेलिया कर, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, कीर्तन बालाकृष्णन, जिंतीमणी कलिता, पारूनिका सिसोदिया. अमनदीप कौर, अक्षिता महेश्वरी

17:50 (IST) 15 Mar 2025

MI vs DC: दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ

मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेस जोनासन, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, मारिझान कॅप, सारा ब्राइस (विकेटकीपर), निक्की प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, तितास साधू, राधा यादव, अरुंधती रेड्डी, एलिस कॅप्सी, तानिया भाटिया, स्नेहा दिप्ती, नंदिनी कश्यप, नल्लापुरेड्डी चरणी

MI vs DC WPL 2025 Final Highlights: मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स वुमन्स प्रीमियर लीग २०२५ फायनलचे हायलाईट्स