जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सने मियामी टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. मारिया शारापोव्हाने संघर्षपूर्ण विजयानंतर उपांत्यपूर्व फेरी गाठली. अव्वल मानांकित सेरेनाने अमेरिकेच्या आणि पात्रता फेरीचा अडथळा पार करून आलेल्या कोको व्हँडेवेघेचे आव्हान ६-३, ६-१ असे संपुष्टात आणले. आता तिचा मुकाबला पाचव्या मानांकित जर्मनीच्या अँजेलिक्यू कर्बरशी होणार आहे. शारापोव्हाने बेल्जियमच्या कर्स्टन फ्लिपकिन्सवर ३-६, ६-४, ६-१ असा विजय मिळवला. अँजेलिक्यू कर्बरने रशियाच्या एकाटेरिना माकारोव्हावर ६-४, १-६, ६-३ अशी मात केली. चेक प्रजासत्ताकच्या आणि आठव्या मानांकित पेट्रो क्विटोव्हाने सर्बियाच्या अॅना इव्हानोव्हिकवर ३-६, ६-०, ६-० असा विजय मिळवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miami wta serena williams breezes into quarters maria sharapova battles on