मालिका किंवा दौऱ्याला सुरुवात होण्याआधी संघनायकाने पत्रकार परिषदेला हजेरी लावायची असते, हा सर्वसाधारण नियम आहे. पण भावासमान सहकारी फिलिप ह्य़ुजेसच्या मृत्यूमुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कला मोठा धक्का बसल्याने त्याची पत्रकार परिषदेपासून सुटका करण्यात आली आहे. मालिकेच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या पत्रकार परिषदेला क्लार्कऐवजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात मायकेल क्लार्कच्या समावेशाविषयी अद्यापही साशंकता आहे. मात्र दुखापतीतून सावरत असणाऱ्या क्लार्कने शनिवारी ऑस्ट्रेलिया संघाच्या सराव शिबिरात भाग घेतला. पहिल्या कसोटीमध्ये खेळण्यासाठी कोणत्याही खेळाडूवर दडपण टाकले जाणार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी याआधीच स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा