फॉम्र्युला-वन शर्यतीचा सम्राट मायकेल शुमाकर याची प्रकृती अद्यापही अत्यवस्थ असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. त्याच्या प्रकृतीचा धोका अद्यापही टळलेला नाही. दरम्यान त्यास अपघात झाला, तेव्हा त्याने वापरलेल्या हेल्मेटमधील कॅमेरातील छायाचित्रांद्वारे अपघाताची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
एका जर्मन स्कीइंगपटूने त्यावेळी अनवधानाने या अपघाताचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते. त्याद्वारे हा अपघात कसा झाला, याची माहिती घेतली जात आहे. त्याच्याकडून घेतलेल्या माहितीनुसार शूमाकर हा साधारणपणे वीस किलोमीटर वेगाने स्कीइंग करत होता. हा काही जास्त नव्हता, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शूमाकर अत्यवस्थ
फॉम्र्युला-वन शर्यतीचा सम्राट मायकेल शुमाकर याची प्रकृती अद्यापही अत्यवस्थ असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले
First published on: 06-01-2014 at 12:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Michael schumacher still critical as probe focuses on helmet camera