स्कीइंगचे दोषी साहित्य, चुकीचे फलक किंवा प्रचंड वेग यापैकी कशानेही मायकेल शूमाकरचा अपघात झाला नसल्याचा निर्वाळा तपास अधिकाऱ्यांनी दिला. ग्रेनोबेल शहरात मेरिबल रिसॉर्टच्या परिसरात स्कीइंग करताना शूमाकरचा अपघात झाला. अपघातात डोक्यावर आपटल्याने शूमाकरची स्थिती खालावली. सध्या तो कोमात असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या या अपघातासाठी वेगमर्यादेचे उल्लंघन करणारा वेग,स्कीइंगचे दोषी साहित्य किंवा चुकीचे दिशादर्शक फलक हे कारणीभूत असल्याची चर्चा होती मात्र सखोल तपासाअंती या सर्व गोष्टींचा शूमाकरच्या अपघाताला कारणीभूत नसल्याने पोलिसांनी स्पष्ट केले. हा अपघात नक्की कशामुळे झाला याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader