सात वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा फॉम्र्युला-वनमधील महान ड्रायव्हर मायकेल शूमाकरचा जगण्यासाठीचा लढा कायम असून चौथ्या दिवशीही त्याची प्रकृती गंभीर आहे. स्कीइंग करताना झालेल्या अपघातानंतर शूमाकर चौथ्या दिवशीही कोमात आहे. त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. पत्नी कोरिना, १६ वर्षीय मुलगी जिना-मारिया, १४ वर्षीय मुलगा मिक हे त्याच्या जवळच आहेत.
मंगळवारी शूमाकरच्या प्रकृतीत किंचितशी सुधारणा झाली होती. त्यामुळे त्याच्या मेंदूवर दोन तासांची शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आले होते. ‘‘शूमाकरची प्रकृती आता स्थिर आहे. पण त्याच्या भवितव्याबद्दल काहीही सांगता येत नाही,’’ असे त्याचे व्यवस्थापक सबिन केहम याने पत्रकारांना सांगितले. शूमारकच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी त्याचे चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये आघाडीवर असलेल्या अर्सेनल संघातील खेळाडूंनीही शूमाकरला लवकर बरे होण्यासाठी एक संदेश पाठवला आहे. फॉम्र्युला-वनमधील माजी विश्वविजेता निकी लौडा यानेही शूमाकरला पाठिंबा दर्शवला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2014 रोजी प्रकाशित
शूमाकरची प्रकृती चौथ्या दिवशीही गंभीर
सात वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा फॉम्र्युला-वनमधील महान ड्रायव्हर मायकेल शूमाकरचा जगण्यासाठीचा लढा कायम असून चौथ्या दिवशीही त्याची प्रकृती गंभीर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-01-2014 at 04:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Michael schumachers condition stable but critical