फॉम्र्युला वन शर्यतीचा सम्राट मायकेल शुमाकर याच्यावरील उपचाराबाबतची महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली असल्याचे त्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या संस्थेने म्हटले आहे. याबाबत त्याची प्रवक्ती सॅबिनी केहेम यांनी याबाबत सांगितले, शुमाकर याला फ्रान्समध्ये झालेल्या अपघातानंतर ग्रेनोबेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तो बेशुद्धावस्थेत काही महिने असतानाच त्याच्या आजाराबाबतची तसेच त्याच्यावरील उपचाराबाबतची काही कागदपत्रे गहाळ झाली आहेत. काही लोक या कागदपत्रांची विक्रीही करीत असल्याचे आमच्या कानावर आले आहे. मात्र ही कागदपत्रे खरीच आहेत की नाही हे आम्हाला माहीत नाही. तथापि, त्याच्या उपचाराबाबतची काही कागदपत्रे गहाळ झाली आहेत हे निश्चित आहे. चाहत्यांनी अशी कागदपत्रे विकत घेऊ नयेत. वैद्यकीय अहवाल व कागदपत्रे ही अत्यंत गोपनीय कागदपत्रे असतात. कोणाला अशी कागदपत्रे मिळाली तर त्यांनी ही कागदपत्रे छापू नयेत किंवा त्यांचा गैरवापर करू नये. ग्रेनोबेल येथील रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने ही कागदपत्रे गहाळ झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली आहेत. ग्रेनोबेल येथून शुमाकरला स्वित्र्झलडमधील एका वैद्यकीय केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले आहे. तो आता शुद्धीवर आला आहे. तो हालचालीही करू लागला आहे असे केहेम यांनी सांगितले.

Story img Loader