बॉक्सिंग विश्वातले दिग्गज खेळाडू आणि माजी हेविवेट चँपिअन माईक टायसन वयाच्या ५४ व्या वर्षी बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन करणार आहेत. १२ सप्टेंबररोजी टायसन रॉय जोन्स ज्युनिअरसोबत एका प्रदर्शनीय सामन्यात खेळतील. २००५ साली टायसन यांनी केविन मॅकब्रिजसोबत अखेरचा सामना खेळला होता. यानंतर तब्बल १५ वर्ष ते बॉक्सिंग रिंगपासून दूर होते. या लढतीसाठी आपण उत्सुक असल्याचं टायसन यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही महिन्यांपूर्वी टायसन यांनी आपला वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यावेळीच टायसन पुन्हा रिंगमध्ये परतणार का अशी त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाली होती. १९८६ साली वयाच्या २० व्या वर्षी टायसन यांनी हेविवेट चँपिअनशीप जिंकत ही स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू हा मान पटकावला होता. यानंतर बॉक्सिंग विश्वावर टायसन यांनी आपलं अधिराज्य निर्माण केलं. टायसन यांनी आपल्या कारकिर्दीत मिडलवेट, सुपर मिडलवेट आणि लाईट हेविवेट अशा तिन्ही पद्धतीत विजेतेपद मिळवलं आहे. २००३ साली टायसन पूर्णपणे हेविवेट प्रकारात खेळायला लागले. त्यामुळे आपल्या पुनरागमनाच्या सामन्यात टायसन कसा खेळ करतात याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mike tyson 54 to make boxing comeback in september psd