‘वॉक द टॉक’ या कार्यक्रमात गुरबचनसिंग रंधवांनी व्यक्त केल्या आठवणी
‘‘रोममध्ये १९६० साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ४०० मीटर शर्यतीआधी मिल्खा सिंगच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. १६ इंजेक्शन्स घेतल्यानंतर शर्यतीला वेगाने सुरुवात करणारा मिल्खा सिंग पहिल्या २०० मीटर शर्यतीपर्यंत तिसऱ्या स्थानी होता. ओटिस डेव्हिस आणि कार्ल कॉफमान यांनी त्याला मागे टाकले होते. ३०० मीटर शर्यतीपर्यंत मिल्खा सिंग पाचव्या स्थानी होता. पण आघाडीवर असल्याचा दावा त्याने केला होता. रोममधील शर्यतीत मिल्खा सिंगचे एकही पाऊल आघाडीवर नव्हते. ते आघाडीवर असते तर त्याचे सुवर्ण किंवा रौप्यपदक हुकले असते, कांस्य नाही. मिल्खाने जागतिक विक्रम मोडीत काढेन असा दावा केला होता, पण त्याला ते कधीच जमले नाही,’’ असे महान अॅथलीट गुरबचनसिंग रंधवा यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा