अमेरिकास्थित प्रकाश अमृतराजला भारताकडून डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत सहभागी करण्याबाबत अखिल भारतीय टेनिस महासंघाचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. केंद्र शासनाने फक्त भारतीय नागरिकत्व असलेल्यांनाच खेळता येईल, असा निर्णय घेतला आहे.
प्रकाश हा ज्येष्ठ टेनिसपटू विजय अमृतराज यांचा मुलगा आहे. अमृतराज हे अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. प्रकाशला डेव्हिस स्पर्धेत सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी मागणी टेनिस महासंघाकडून करण्यात आली होती. २००८मध्ये केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्पर्धाबाबत धोरण निश्चित केले होते. त्यानुसार परदेशात स्थायिक झालेल्या व भारताचे नागरिकत्व नसलेल्या खेळाडूंना भारतीय संघाकडून खेळता येणार नाही असा नियम करण्यात आला होता. त्यानुसार प्रकाश अमृतराज, सुनीता राव व नेहा उबेरॉय या खेळाडूंना भारतीय संघाकडून खेळता येणार नाही.
केंद्रीय क्रीडा सचिव पी.के.देव यांनी सांगितले, जर प्रकाश हा भारतीय नागरिक असेल, तर तो भारतीय संघाकडून खेळू शकेल.

Story img Loader