Mirabai Chanu Silver Medal: ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने २०२२ च्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोलंबियामध्ये चीनच्या हौ झिहुआला पराभूत करून रौप्यपदक जिंकले आहे. टोकियो २०२० चॅम्पियन चीनच्या हौ झिहुआसमोर मीराबाईच्या शक्तीचा कस लागला पण अखेरीस मीराबाई चानूने मीराबाईचे हे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दुसरे पदक आपल्या नावे केले आहे. दरम्यान, चीनच्या जियांग हुइहुआने २०६ किलो (स्नॅचमध्ये ९३ किलो आणि जर्कमध्ये ११३ किलो) एकत्रित वजन उचलून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
प्राप्त माहितीनुसार चीनच्या झिहुआने एकूण १९८ किलो (स्नॅचमध्ये ८९ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १०९ किलो) वजन उचलले होते. या रेकॉर्डला टक्कर देत मीराबाईने तब्बल २०० किलो (स्नॅचमध्ये ८७ किलो आणि क्लीन जर्कमध्ये ११३ किलो) वजन उचलले होते.मीराबाईने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये यापूर्वी २०१७ मध्ये १९४ किलो (८५ किलो स्नॅच व क्लीन जर्कमध्ये १०९ किलो) वजन उचलून सुवर्णपदक जिंकले होते.
मीराबाई चानू ठरली चॅम्पियन
भारतीय वेटलिफ्टर मीराबाईने नुकतेच राष्ट्रकुल २०२२ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. राष्ट्रकुल स्पर्धेत स्टार खेळाडू मीराबाईने स्नॅचमध्ये ८५ किलो वजन उचलून संथ सुरुवात केली होती. मीराबाईला तिच्या दुसऱ्या क्लीन अँड जर्क प्रयत्नात संघर्ष करावा लागला पण तिने वेळ सावरून एकत्रित एकूण ११३ किलो वजन पूर्ण केले आणि क्लीन अँड जर्कमध्ये जियांगशी बरोबरी साधली.