India vs Pakistan, Asia Cup 2023: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक २०२३चा सुपर-४ सामना १० सप्टेंबर रोजी कोलंबो येथे खेळवला जाईल. पण त्याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीविरुद्ध कसे खेळावे, यासाठी भारतीय फलंदाज नेटमध्ये कसून सराव करत आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाची आघाडीची फळी कोसळली. शाहीन आफ्रिदीने रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजासारख्या खेळाडूंना बाद करत एक दबदबा निर्माण केला. पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना कसा करावा? यावर टीम इंडियाने एक योजना आखली असून त्यावर तोडगा काढला आहे.

आफ्रिदीच्या स्विंग आणि वेगाचा सामना करण्यासाठी भारतीय फलंदाज विशेष कसरत आणि रणनीती वापरून सराव करत आहेत. रोहित आणि विराटची उणीव भासणारी टीम इंडिया, महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पहिल्या नेट सत्रात डाव्या हाताच्या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी एक योजना आखताना दिसली. त्या दोघांनी १५०च्या स्पीडने येणाऱ्या चेंडूचा कसा सामना करावा यावर जोर दिला. या दरम्यान भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या तिन्ही गोलंदाजांनी कशाप्रकारे विकेट्स घेतल्या याचे व्हिडीओ पाहिले आणि त्यावरून रणनीती आखली.

टीम इंडियाच्या या सराव सत्रात के.एल. राहुल, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यासह अनेक फलंदाजांनी जबाबदारी पार पाडत नेटमध्ये जोरदार सराव केला. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात झगडणारा गिल त्याच्या फलंदाजीकडे अधिक लक्ष देतोय. दरम्यान, सराव सत्रामध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी फलंदाजांवर लक्ष ठेवले. हे दोघेही संपूर्ण सत्रात फलंदाजांच्या संपर्कात राहिले.

हेही वाचा: IND vs PAK: ‘वर्ल्डकप मधून बाहेर काढू’ असं डिवचणाऱ्या शोएब अख्तरचे दोन दिवसातचं बदलले शब्द; म्हणाला, “भारताला त्यांच्या देशात…”

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये शाहीन आफ्रिदीची भीती

हारिस रौफ आणि नसीम शाह यांनीही टीम इंडियाविरुद्ध यश मिळवले आहे, दुसरीकडे डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी टीम इंडियासाठी नेहमीच मोठे आव्हान ठरला आहे. युवा वेगवान गोलंदाजांविरुद्ध बाद होण्याच्या बाबतीत रोहित शर्मा, के.एल. राहुल आणि विराट कोहली आतापर्यंत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आफ्रिदीने भारताविरुद्ध आतापर्यंत ४ सामन्यात १९.२५च्या सरासरीने ७ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा: IND vs PAK: टीम इंडियाचे वर्क आउट पाहून प्रतिस्पर्धी संघांना भरली धडकी, पाकिस्तान सामन्यापूर्वी नेटमध्ये केला कसून सराव

शाहीन आफ्रिदीने २०२२ टी२० विश्वचषकादरम्यान भारताची फलंदाजी उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यादरम्यान त्याने के.एल. राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. वेगवान गोलंदाजाच्या शानदार स्पेलमुळे पाकिस्तानने भारताविरुद्धचा पहिला विश्वचषक २०२१ साली जिंकला. यावेळी कोणता संघ वन डे विश्वचषक जिंकणार याचे भाकीत कोणीच करू शकत नाही. टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील पाकिस्तान विरुद्धचा सामना हा १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Story img Loader