आयसीसी महिला विश्वचषकासाठी भारतीय पंधरा सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली असून संघाचे नेतृत्व अनुभवी मिताली राजकडे देण्यात आले आहे.
महिलांची विश्वचषक स्पर्धा ३१ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईमध्ये रंगणार आहे.
भारताचा सलामीचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
संघ : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, झुलान गोस्वामी, अमिता शर्मा, गौहर सुलताना, एम. थिरुशकामिनी, सुलक्षणा नाईक, एकता बिश्त, मोना मेश्राम, रसनारा परविन, निरंजना नागरंजन, पूनम राऊत, रीमा मल्होत्रा, करुणा जैन आणि शुभलक्ष्मी शर्मा.

Story img Loader