ऑस्ट्रेलियाची मशिनगन म्हणून ओळखल्या जाणाऱया गतीमान गोलंदाज मिचेल जॉन्सनला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आराम देण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पुढील संपूर्ण मालिकेत मिचेलला तंदरुस्त राखण्यासाठी या सामन्यात मिचेलला आराम देण्यात आल्याचे ऑस्ट्रेलिया संघाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या अॅशेस मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध ही पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यापुढे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुद्धा मालिकेचे आयोजन केले गेले आहे. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापन संघातील काही खेळाडू बदलत ठेवण्याची शक्यता आहे.
लेहमन म्हणाले की, “जॉन्सनसाठी ही मालिका महत्वाची ठरली यात काहीच शंका नाही. सध्या जॉन्सनची जादू सुरु असल्याचीही कल्पना आम्हाला आहे. तरीसुद्धा आम्ही त्याला पुढील सामन्यांसाठी तंदरुस्त राखण्याच्या उद्देशाने फक्त एका सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे. त्याच्या जागी पर्यायी म्हणून खेळविण्याची वेळ आमच्यावर आली, तर कोणत्या खेळाडूला खेळवायचे हा प्रश्न निर्माण न होण्यासाठी तात्पुरता बदल करण्यात आला आहे.” 

Story img Loader