आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांवर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने दुहेरी मोहोर उमटवली. झंझावाती फॉर्ममध्ये असणाऱ्या जॉन्सनने वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि वर्षांतील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू अशा दोन महत्त्वपूर्ण पुरस्कारांवर कब्जा केला. जॉन्सनने दुसऱ्यांदा वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार पटकावण्याची किमया केली. लोकपसंतीचा पुरस्कार भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पटकावला.
 ग्राह्य़ धरण्यात आलेल्या कालावधीत (२६ ऑगस्ट २०१३ ते १७ सप्टेंबर २०१४) जॉन्सनने कसोटी क्रिकेटमध्ये १५.२३च्या सरासरीने ५९ बळी, तर १६ एकदिवसीय सामन्यात २१ बळी मिळवले. वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या सर गॅरी सोबर्स चषकावर दुसऱ्यांदा नाव कोरणारा जॉन्सन हा रिकी पॉन्टिंगनंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
‘‘क्रिकेटमधील महान खेळाडूंनी या पुरस्कारावर नाव कोरले आहे. माझ्यासाठी हा विशेष पुरस्कार आहे. संघाच्या विजयात योगदान देता आल्याचे समाधान आहे,’’ अशा शब्दांत जॉन्सनने भावना व्यक्त केल्या.
आयसीसीचे पुरस्कार पुढीलप्रमाणे
वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू : मिचेल जॉन्सन
वर्षांतील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू : मिचेल जॉन्सन
वर्षांतील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू : एबी डीव्हिलियर्स
सर्वोत्तम ट्वेन्टी-२० प्रदर्शन : आरोन फिंच
सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू : गॅरी बॅलन्स
वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू : सारा टेलर
संलग्न व सहसदस्य देशातील सर्वोत्तम क्रिकेटपटू : प्रेस्टन मोमोसेन
सर्वोत्तम महिला ट्वेन्टी-२० प्रदर्शन : मेग लॅनिंग
खेळभावना जपणूक पुरस्कार : कॅथरिन ब्रंट
सर्वोत्तम पंच : रिचर्ड केटलबोरो
लोकपसंतीचा पुरस्कार : भुवनेश्वर कुमार

Story img Loader