Mitchell Marsh Breaks Virat Kohli’s Record: मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा ३-० असा क्लीन स्वीप केला आणि या मालिकेत कांगारूंचा कर्णधार मार्शने अप्रतिम फलंदाजी केली. या मालिकेत सर्वाधिक धावा केल्याबद्दल त्याला प्लेअर ऑफ द सिरीज घोषित करण्यात आले. या मालिकेत मिचेल मार्शने विराट कोहलीच्या एका विक्रमाची बरोबरी केली, तर कर्णधार म्हणून विराट कोहलीचा दुसरा विक्रम मोडीत काढत. तो त्याच्याही पुढे गेला.

मिचेल मार्शने मोडला विराट कोहलीचा विक्रम –

मार्शने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक १८६ धावा केल्या. तसेच कर्णधार म्हणून तो तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. याआधी, तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर होता. त्याने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या. आता मिचेल मार्श त्याला मागे टाकून त्याच्या पुढे गेला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर केन विल्यमसन आहे, ज्याने २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत कर्णधार म्हणून १७५ धावा केल्या होत्या.

तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

१८६ धावा – मिचेल मार्श (वि. दक्षिण आफ्रिका, २०२३)
१८३ धावा – विराट कोहली (वि. वेस्ट इंडिज, २०१९)
१७५ धावा – केन विल्यमसन (वि. पाकिस्तान, २०१६)
१६२ धावा – रोहित शर्मा (वि श्रीलंका, २०१७)
१६० धावा – केन विल्यमसन (वि. श्रीलंका, २०२०)

हेही वाचा – Asia Cup 2023: बीसीसीआयचे अध्यक्ष अन् उपाध्यक्ष आशिया चषकासाठी पाकिस्तानला रवाना; शुक्ला म्हणाले, “फक्त क्रिकेटवर…”

मिचेल मार्शने केली कोहलीची बरोबरी –

टी-२० मालिकेत कर्णधार म्हणून १८०च्या स्ट्राइक रेट आणि सरासरी पेक्षा जास्त धावा करणारा मिचेल मार्श हा विराट कोहलीनंतरचा दुसरा फलंदाज ठरला. मार्शने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १८६ च्या सरासरीने आणि १८६ च्या स्ट्राइक रेटने १८६ धावा केल्या. या सामन्यांमध्ये त्याने २ अर्धशतके झळकावली आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ९२ होती. यादरम्यान त्याने २४ चौकार आणि ८ षटकारही मारले.

हेही वाचा – Rishabh Pant : टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी ऋषभ पंत सज्ज, एनसीएमध्ये दाखवला जबरदस्त फिटनेस, पाहा VIDEO

विराट कोहलीबद्दल सांगायचे तर, त्याने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधार म्हणून १८० पेक्षा जास्त सरासरी आणि स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात, कोहली आणि मार्श हे दोनच कर्णधार आहेत, ज्यांनी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत कोणत्याही संघाविरुद्ध स्ट्राइक रेटने आणि १८० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत.

Story img Loader