Australia All Rounder Mitchell Marsh Leaves Australia Squad: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाने ६ सामने खेळले असून ४ जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाचे ८ गुण असून ते तिसऱ्या स्थानावर आहे. पण विश्वचषकाच्या मध्यंतरी संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी अष्टपैलू मिचेल मार्श मायदेशी परतत आहे. वैयक्तिक कारणांमुळे तो विश्वचषकाच्या मध्यावर मायदेशी जाणार आहे. यापूर्वी ग्लेन मॅक्सवेल जखमी झाला होता. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध आहे. या सामन्यासाठी संघात अॅलेक्स कॅरी, मार्कस स्टॉइनिस किंवा शॉन अॅबॉट यापैकी एकाला संधी मिळू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्शबद्दल माहिती दिली. आयसीसीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार मार्शच्या पुनरागमनाबाबत कोणतेही अपडेट मिळालेले नाही. वैयक्तिक कारणास्तव तो ऑस्ट्रेलियाला परतत आहे. मार्शने या विश्वचषकात आतापर्यंत विकेट घेण्यासोबत २२५ धावा केल्या आहेत. लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर लगेचच त्याने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. त्याने १२१ धावा केल्या होत्या. मार्श हा ऑस्ट्रेलियन संघाचा महत्त्वाचा भाग असून उपांत्य फेरीपूर्वी त्याचे बाहेर पडणे संघासाठी घातक ठरू शकते.

या स्पर्धेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सलग चार सामने जिंकून शानदार पुनरागमन केले. अशा स्थितीत मिचेल मार्शचे विश्वचषक सोडून ऑस्ट्रेलियात परतणे हा संघाच्या विजय रथासाठी मोठा धक्का आहे. इथून ऑस्ट्रेलियाला आपले सर्व सामने जिंकायचे आहेत आणि भविष्यातील सामन्यांमध्ये कांगारूंचा संघ मार्शला किती मिस करेल हे पाहणे रंजक ठरेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mitchell marsh ruled out of icc cricket world cup 2023 indefinitely due to personal reasons vbm
Show comments