Mitchell Marsh’s old video has gone viral after a century: ॲशेस २०२३ च्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळला जात आहे. सामन्यातील पहिला दिवस खूपच रोमांचक ठरला. पहिल्या दिवशी दोन्ही संघाच्या मिळून १३ विकेट्स पडल्या. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला ऑस्ट्रेलियन संघ २६३ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडनेही ६८ धावांत तीन गडी गमावले. ऑस्ट्रेलियाकडून सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना मिचेल मार्शने शानदार शतक झळकावले. या शतकानंतर मिचेल मार्शचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्शने ॲशेसच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ११८ चेंडूत १७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११८ धावा केल्या. मार्शच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. या शतकानंतर मिचेल मार्शचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बहुतेक ऑस्ट्रेलियन माझा तिरस्कार करतात, असे म्हणताना ऐकू येत आहे.

बहुतेक ऑस्ट्रेलियन माझा तिरस्कार करतात – मिचेल मार्श

व्हायरल व्हिडीमध्ये मिचेल मार्श एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणत आहे की, “होय, बहुतेक ऑस्ट्रेलियन माझा तिरस्कार करतात. ऑस्ट्रेलियन लोक उत्साही आहेत, त्यांना त्यांचे क्रिकेट आवडते, त्यांना लोकांनी चांगले करावे असे वाटते. कसोटी स्तरावर खूप संधी होत्या आणि त्या मी प्राप्त करु शकलो नाही, यात शंका नाही. परंतु आशा आहे की ते माझा आदर करतील.”

व्हिडीओमध्ये मार्श पुढे म्हणाला, “सत्य हे आहे की मी परत येत राहिलो आणि मला ऑस्ट्रेलियासाठी खेळायला आवडते. मला बॅगी ग्रीन कॅप्स घालायला आवडते आणि मी प्रयत्न करत आहे. मला आशा आहे की, मी एक दिवस त्यांची मनं जिंकेल.”

हेही वाचा – Happy Birthday MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीचा आज ४२वा वाढदिवस! जाणून घ्या ‘कॅप्टन कूल’शी संबंधित ‘या’ १० खास गोष्टी

तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस कसा राहिला?

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला ऑस्ट्रेलियन संघ २६३ धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. याशिवाय ख्रिस वोक्सने ३ आणि स्टुअर्ट ब्रॉडने २ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी, पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने पहिल्या दिवसअखेर ३ विकेट्सच्या मोबदल्यात ६८ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mitchell marshs old video has gone viral after a century in ashes 2023 series 3rd match vbm