New Zealand New White Ball Captain: न्यूझीलंड क्रिकेट संघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. केन विल्यमसननंतर न्यूझीलंड संघाला कायमस्वरूपी एक नवा कर्णधार मिळाला आहे. केन विल्यमसनने टी-२० विश्वचषक २०२४ नंतर टी-२० आणि वनडे संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. आता न्यूझीलंड संघाने त्याच्या जागी उत्कृष्ट गोलंदाज आणि फिरकीपटू असलेल्या खेळाडूची कर्णधार म्हणून घोषणा केली आहे.

न्यूझीलंडचा दिग्गज फिरकीपटू मिचेल सँटनरची अधिकृतपणे न्यूझीलंडच्या टी-२० आणि वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेटच्या या दोन्ही फॉरमॅटमध्ये १०० पेक्षा जास्त वेळा किवी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार खेळाडूंपैकी सँटनरने हा एक आहे. गेल्या महिन्यात झालेल्या श्रीलंका दौऱ्यासह २४ टी-२० आणि ४ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने संघाचे नेतृत्व केले आहे.

Sitanshu Kotak added as batting coach to India team ahead of England white ball tour
India New Batting Coach: भारतीय संघाला मिळाला नवा फलंदाजी प्रशिक्षक, इंग्लंडविरूद्ध टी-२० मालिकेपूर्वी ताफ्यात होणार सामील
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kevin Pietersen is available to become the batting coach of the Team India his post viral on social media
Kevin Pietersen : टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज उत्सुक, पोस्ट होतेय व्हायरल
ojas kulkarni of kolhapur participated in first world cup kho kh
ऑस्ट्रेलियन खो-खोची ‘ओजस्वी’ कहाणी! खेळ माहीत नसलेल्या देशाचा भारतीय ‘द्रोणाचार्य’
Gautam Gambhir Wants Yashasvi Jaiswal As Next India Captain After Rohit Sharma at loggerheads with Ajit Agarkar
India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद
Rohit Sharma tells selectors he will remain India Test captain until board chooses the future captain
Rohit Sharma : ‘नवा कर्णधार शोधा…’, आढावा बैठकीत रोहित शर्माने बीसीसीआयकडे मागितली काही महिन्यांची मुदत?
Who is Devajit Saikia who was elected as the BCCI Secretary after Jay Shah
Devajit Saikia : कोण आहेत देवजीत सैकिया? जय शाहांनंतर बीसीसीआयच्या सचिवपदी झाली निवड
New Zealand announces 15 member squad led by Mitchell Santner for Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! केन विल्यमसन नव्हे तर ‘हा’ खेळाडू सांभाळणार धुरा

हेही वाचा – IND vs AUS: बुमराह-आकाशदीपची ऐतिहासिक भागीदारी, ७७ वर्षांत ऑस्ट्रेलियाविरूद्ध अशी कामगिरी करणारी पहिलीच जोडी

सँटनरचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून कार्यकाळ डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारीच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेपासून सुरू होईल. या दोन मालिकांमुळे न्यूझीलंडसाठी टी-२० आणि वनडे क्रिकेटचा मोठा टप्पा सुरू होईल. यामध्ये फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानमध्ये एकदिवसीय तिरंगी मालिका, त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि मायदेशात होणाऱ्या पाकिस्तानविरूद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेचा समावेश आहे.

हेही वाचा – IND vs AUS: आकाशदीपचा गगनचुंबी षटकाराने खुद्द विराटला केलं चकित, भन्नाट प्रतिक्रिया देत कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये मारली उडी; VIDEO व्हायरल

कर्णधारपद मिळाल्यानंतर मिचेल सँटनर काय म्हणाला?

सँटनर म्हणाला, “ही जबाबदारी सोपवली जाणं हा नक्कीच मोठा सन्मान आणि विशेषाधिकार आहे. लहान असताना नेहमीच आपण न्यूझीलंडसाठी खेळणं हे स्वप्न मनात बाळगून असतं, परंतु अधिकृतपणे दोन फॉरमॅटमध्ये तुमच्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणं हे विशेष आहे. हे एक नवीन आव्हान आहे आणि पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटच्या महत्त्वाच्या टप्प्यात सामील होण्यासाठी मी उत्सुक आहे. साहजिकच आमच्या काही अनुभवी खेळाडूंच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात थोडासा बदल झाला आहे. मला वाटते की उर्वरित खेळाडू आणि युवा खेळाडूंनी आता आव्हान स्वीकारून या संघाला अधिक यशापर्यंत नेणे हे रोमांचक असणार आहे.”

हेही वाचा – IND vs AUS: आकाशदीपचा चौकार अन् गंभीर-विराटचं आक्रमक सेलिब्रेशन, भारताने फॉलोऑन टाळताच ड्रेसिंग रूममधील VIDEO व्हायरल

न्यूझीलंड संघाचे कोच सँटनकरच्या नियुक्तीनंतर काय म्हणाले?

सँटनरच्या नावावर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये २ हजारहून अधिक धावा आणि २२५ विकेट आहेत. लाल चेंडूचा कर्णधार टॉम लॅथम याला कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी सँटनरकडे पांढऱ्या चेंडूची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले. प्रशिक्षक म्हणाले, तो म्हणाला, “आमच्याकडे टॉम लॅथम हा अनुभवी आणि कुशल कर्णधार आहे, ज्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. ऑक्टोबरमध्ये पूर्णवेळ कसोटी कर्णधार म्हणून टॉमने उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि यामुळेच त्याने कसोटी कामगिरीवर लक्ष केंद्रित करावे.”

सँटनरबद्दल बोलताना कोच म्हणाले, “मिचेल हा एक एक टीम मॅन आहे आणि सर्वच बाबतीत संघाने उत्तम नेतृत्त्व करतो. तो एक शांत आणि उत्तम व्यक्तिमत्त्व असलेल्या खेळाडू आहे. ड्रेसिंर रूममध्येही त्याला खूप मान आहे आणि यामुळे संघाचे तो चांगले नेतृत्त्वही करेल.”

Story img Loader