Mitchell Santner’s Catch Video Viral: ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकापूर्वी जगभरातील संघ एकदिवसीय मालिका खेळत आहेत. एकीकडे भारत आणि पाकिस्तानसह सहा आशियाई संघ आशिया कप खेळत आहेत. दुसरीकडे इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये चार सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. रविवारी या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील मिचेल सँटनरचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तिसर्या षटकात सँटनरने घेतला उत्कृष्ट झेल –
तिसऱ्या षटकात ट्रेंट बोल्टने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर जॉनी बेअरस्टोच्या चकवा दिला. वेगात आलेला चेंडू बेअरस्टोच्या बॅटला लागला आणि शॉर्ट कव्हरच्या दिशेने उडून गेला. त्यानंतर त्या दिशेला क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या सँटनरने ताबडतोब हेवत उडी मारली आणि डाव्या हाताने अप्रतिम झेल घेतला. मिचेल सँटनरचे हे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहून इंग्लंडचा संघ चकीत झाला. अशाप्रकारे सँटनरच्या शानदार झेलमुळे बेअरस्टोला अवघ्या ६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. सँटनर त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
बोल्टने ८ धावांत तीन विकेट घेतल्या –
ट्रेंट बोल्टने अवघ्या ८ धावांवर इंग्लंडच्या तीन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या तीन खेळाडूंमध्ये जॉनी बेअरस्टो, जो रूट आणि बेन स्टोक्स यांचा समावेश आहे. ट्रेंट बोल्टने प्रथम जॉनी बेअरस्टोला त्याच्या तिसऱ्या आणि डावाच्या दुसऱ्या षटकात मिचेल सँटनरकरवी झेलबाद केले. बेअरस्टो ६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर त्याच षटकात त्याने जो रूटलाही ० धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पहिल्या वनडेत अर्धशतक झळकावणारा बेन स्टोक्स या सामन्यात केवळ १ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
इंग्लंडचे ४ खेळाडू ३४ धावांत बाद –
इंग्लंडला ८ षटकांत ३४ धावांत ४ धक्के बसले आहेत. चौथी विकेट हॅरी ब्रूकच्या रूपाने पडली. ब्रूक अवघ्या २ धावा करून बाद झाला. जोस बटलर आणि मोईन अली क्रीझवर फलंदाजी करत आहेत. आम्ही तुम्हाला सांगूया की न्यूझीलंड संघ ४ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. न्यूझीलंडने मालिकेतील पहिला सामना ८ विकेटने जिंकला होता. त्याआधी चार सामन्यांची टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत होती.
हेही वाचा – Asia Cup 2023: फखर जमानने IND vs PAK सामन्यात जिंकली चाहत्यांची मने, VIDEO होतोय व्हायरल
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना साउदम्प्टन येथे खेळला जात आहे. पावसामुळे हा सामना ३४-३४ षटकांचा करण्यात आला आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे योग्य ठरला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने न्यूझीलंडकडून १०० वा एकदिवसीय सामना खेळताना शानदार गोलंदाजीने इंग्लंडच्या टॉप ऑर्डरला पूर्णपणे उद्ध्वस्त केले.