Mitali Raj Statement on Harmanpreet Kaur and India Captaincy: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारतीय संघाची कामगिरी फारच साधारण राहिली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने प्रत्येक विभागात सर्वसाधारण कामगिरी करत चाहत्यांना निराश केले. भारतीय संघाची फलंदाजी तर फसलीच पण क्षेत्ररक्षण करताना संघाने अनेक साधे झेलही सोडले. महिला विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि परिणामी भारताला विश्वचषकातील गट टप्प्यातून बाहेर पडावे लागले.

हेही वाचा – IND vs NZ India Playing 11: टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू होणार न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, कशी असणार भारताची प्लेईंग इलेव्हन?

IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Jammu & Kashmir Election Results 2024
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 : जम्मू-काश्मीरची सत्ता मिळवली, कलम ३७० बाबत आता कोणती भूमिका? ओमर अब्दुल्ला म्हणाले…
aditya thackeray eknath shinde contractor mantri
“मी ‘चीफ मिनिस्टर’ नाही, तर ‘कॉमनमॅन’” म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले, “सर्वांना माहिती आहे की ते…”
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार? या प्रश्नावर शरद पवार स्पष्टच बोलले…
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
Govinda Hospitalized after Shooting Himself Accidently
अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी, पत्नीने दिली प्रकृतीबद्दल माहिती
Maharashtra News Live Update in Marathi| Mumbai Pune Live Updates in Marathi
Rahul Gandhi on Haryana Election Result: हरियाणातील पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणूक आयोगाला…”

हरमनप्रीत कौरला कर्णधारपदावरून हटवण्यावर मिताली राजचे मोठे वक्तव्य

भारतीय संघाला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर भारतीय संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध विजय निश्चितच नोंदवला, मात्र त्यानंतर एका महत्त्वाच्या सामन्यात संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकत असलेला सामना गमावला. सेमीफायनलच्या शर्यतीत पोहोचण्यासाठी भारतासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. भारताच्या या पराभवानंतर भारताची माजी कर्णधार मिताली राज हिने टीम इंडियाच्या कर्णधारपदावर मोठे वक्तव्य केले आहे.

हेही वाचा – Rohit Sharma Ritika Sajdeh: रोहित शर्मा दुसऱ्यांदा होणार बाबा? पत्नी रितिका सजदेहचा ‘तो’ VIDEO व्हायरल

भारताच्या खराब कामगिरीनंतर भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राजने मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय निवड समिती कर्णधार बदलण्याचा विचार करत असेल तर त्यांनी आता हे पाऊल उचलले पाहिजे, असे मिताली राजने म्हटले आहे. यासोबतच मितालीने भारतीय संघातील या दोन खेळाडूंपैकी एकाला कर्णधार बनवण्याचा सल्ला दिला आहे.

पीटीआयशी बोलताना मिताली राजला कर्णधार बदलाबाबत विचारले असता ती म्हणाली की, निवडकर्त्यांना त्यात बदल करायचे असतील तर त्यांनी वेळ न घालवता कर्णधार बदलण्याची ही योग्य वेळ आहे कारण पुढचा विश्वचषक अगदी जवळ आला आहे. तरुण खेळाडूला कर्णधार बनवण्याचा सल्ला तिने दिला. मिताली म्हणाली, “निवडकर्त्यांनी कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतल्यास, माझी निवड तरूण खेळाडूला कर्णधारपद देण्याची असेल. कर्णधार बदलण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. जर तुम्ही आणखी उशीर केला तर समोर आणखी एक विश्वचषक (वनडे वर्ल्डकप) येऊ घातला आहे. जर तुम्ही आत्ताच बदल केला नाही, तर पुढे जाऊन बदल करणं योग्य ठरणार नाही कारण वर्ल्डकप जवळ आला असेल.”

पुढील कर्णधार कोण असू शकतो हे सांगताना मिताली म्हणाली, तो म्हणाला, “स्मृती तिथे आहे (स्मृती मानधना २०१६ पासून भारताची उपकर्णधार) पण मला वाटते जेमिमासारखी खेळाडू कर्णधारपदासाठी अधिक योग्य असेल. ती २४ वर्षांची आहे आणि दीर्घ कालावधीसाठी संघाचे नेतृत्व करू शकते. ती सर्वांशीच बोलते आणि सामन्याबाबत चर्चाही करत असते. या स्पर्धेत तिच्या कामगिरीने मला फारच प्रभावित केलं आहे.”

हेही वाचा – IND vs NZ Live Streaming: भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका मोफत कुठे पाहता येणार? जाणून घ्या चॅनेल आणि सामन्याची वेळ

भारतीय संघाला सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ५८ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे टीम इंडियाचा नेट रनरेट लक्षणीयरीत्या कमी झाला. यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ विकेट्सने विजय मिळवला होता.पाकिस्तानपाठोपाठ भारताने श्रीलंकेला ८२ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून इतिहास घडवला. पण त्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि या पराभवासह उपांत्य फेरीत जाण्याचे भारताचे स्वप्न भंगले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १४ धावांची गरज होती. कर्णधार हरमनप्रीत कौर क्रीजवर होती आणि तिने अर्धशतक पूर्ण केले होते. हरमनप्रीत कौरने पहिल्याच चेंडूवर एकच धाव घेतली. यानंतर भारताने लागोपाठ दोन चेंडूत दोन विकेट गमावल्या. तिसऱ्या चेंडूवर विकेट धावबादच्या रूपात गमावली. शेवटच्या तीन चेंडूत भारताला विजयासाठी १३ धावांची गरज होती. यावेळीही हरमनप्रीतकडे स्ट्राइक होती, मात्र तिने यावेळीही सिंगल घेण्याचा निर्णय घेतला. ही चूक भारताला महागात पडली. चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवांसह भारताने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.