Mitali Raj on World Cup 2023: भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने सांगितले की, भारतीय पुरुष संघाला यंदाच्या विश्वचषकात घरच्या मैदानावर ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वर्ल्ड कप होणार आहे. याआधी भारताने १९८३ आणि २०११ मध्ये दोनदा विश्वचषक जिंकला आहे. मिताली म्हणाली की, “एक क्रिकेट फॅन म्हणून मला भारतीय संघाने अंतिम फेरीत खेळावे असे वाटते.”

भारताची महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने पुरुष संघाच्या विश्वचषक २०२३ संदर्भात भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “टीम इंडियासाठी ही एक मोठी संधी आहे, आम्ही यजमान आहोत आणि परिस्थिती आमच्या अनुकूल आहे.” मिताली पुढे म्हणाली, “महिला प्रीमियर लीग फायनलच्या वेळी बोलताना ती म्हणाली, “जर संघाने चांगली कामगिरी केली तर एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची सुवर्ण संधी रोहित शर्माच्या संघाला आहे. टीम इंडिया तिसऱ्यांदा आणि तेही मायदेशात विश्वचषक उंचावू शकतो.”

KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी
Congress Priyanka Gandhi held road show in two constituencies in Nagpur on Sunday
प्रियंका गांधींचा आज नागपुरात या दोन ठिकाणी ‘रोड-शो’
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Prithviraj Chavan campaign in Karad, Prithviraj Chavan,
सत्ता आल्यावर कराड जिल्हा करणार – पृथ्वीराज चव्हाण
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?

हेही वाचा: Rohit Sharma: रोहित शर्माचे २०१९ विश्वचषकाच्या आठवणींवर सूचक विधान; म्हणाला, “मला पुन्हा त्याच झोनमध्ये…”

पुढे मिताली राज म्हणाली की, “काश्मीरमध्ये महिला क्रिकेट वाढण्याची मोठी बी क्षमता सीसीआयमध्ये आहे. त्यामुळे ते यावर नक्की विचार करतील. महिला क्रिकेटला आणखी पुढे नेण्यासाठी हे योग्य वेळ आहे असे माझे मत आहे. महिला प्रीमिअर लीगमुळे अनेक युवा क्रिकेटपटूंना संधी मिळेल.”

भारतातील १० शहरांमध्ये सामने होणार आहेत

विश्वचषकात एकूण ५८ सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये १० सराव सामन्यांचा समावेश आहे. विश्वचषकाचे सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे सामने होणार आहेत. गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम व्यतिरिक्त हैदराबाद येथे सराव सामने होणार आहेत.

हेही वाचा: Sunil Gavaskar: “आगामी १०-१५ वर्षात भारत एक स्पोर्टिंग…”, नीरज चोप्रा, प्रज्ञानंद, प्रणॉय यांच्या यशानंतर गावसकरांचे सूचक विधान

श्रीलंका आणि नेदरलँडला क्वालिफायरमधून प्रवेश मिळाला

या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका आणि नेदरलँडचे संघ पात्रता म्हणून या स्पर्धेत पोहोचले आहेत. या दोघांशिवाय यजमान भारत, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ विश्वचषकात दिसणार आहेत. भारताचा पहिला सामना हा ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये होणार आहे. त्यानंतर १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये बहुप्रतीक्षित असा भारत आणि पाकिस्तान सामना रंगणार आहे.