आदित्य मित्तल व आदित्य सामंत या दोन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मुलांच्या गटात,तर तामिळनाडूच्या एम.एस.दर्शना हिने मुलींच्या गटात आघाडी घेत सात वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आव्हान राखले.
पुणे जिल्हा चेस सर्कलतर्फे बृहन महाराष्ट्र कॉमर्स महाविद्यालयात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मित्तल व सामंत यांनी सातव्या फेरीअखेर प्रत्येकी साडेसहा गुणांची कमाई केली आहे. मित्तल याने सहाव्या फेरीतील आघाडीवीर आर्य भक्ता (पश्चिम बंगाल) याच्यावर सनसनाटी विजय मिळविला. सामंत याने उत्तरप्रदेशच्या आर्यनसिंग याला पराभूत केले. आर्य भक्ता व गोव्याच्या लिऑन मेंडोसा यांनी प्रत्येकी सहा गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. मेंडोसाने सातव्या फेरीत वेदांत कुंभकोणम याला हरविले. प्रज्वल कोळी या महाराष्ट्राच्या खेळाडूने आंध्रप्रदेशच्या व्ही.सुमंत याच्यावर मात करीत आपली गुणसंख्या साडेपाच केली आहे. महाराष्ट्राच्याच वल्लभ कवी याचेही साडेपाच गुण झाले आहेत. त्याने साग्निक चक्रवर्ती याच्यावर मात केली. वरद आठल्ये व देव शहा यांचे प्रत्येकी पाच गुण झाले आहेत. त्यांनी अनुक्रमे साईराज गोपाळ व एम.जी.सुमुख यांचा पराभव केला.
मुलींमध्ये दर्शना हिने सातव्या फेरीअखेर सात गुण घेत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. तिने कर्नाटकच्या भाग्यश्री पाटील (६) हिला हरविले. भाग्यश्री हिच्याबरोबरच माही दोशी (गुजरात), संस्कृती वानखेडे (महाराष्ट्र), एन.यशाविश्री (तामिळनाडू) यांचेही प्रत्येकी सहा गुण झाले आहेत. म् दोशी हिने एस.बी.सविता हिला हरविले. वानखेडे हिने आपलीच सहकारी तनिषा बोरामणीकर हिचा पराभव केला. यशाविश्री हिने कर्नाटकच्या आर्वि जैन हिचा पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा