पॅरिस : भारताचा २१ सदस्यीय नेमबाजी संघ ऑलिम्पिकमधील १२ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे. नेमबाजी स्पर्धांना आज, शनिवारपासून सुरुवात होणार असून, पहिल्याच दिवशी रायफल प्रकारातील मिश्र सांघिकचे पदक निश्चित होणार आहे.

पहिल्याच दिवशी १० मीटर रायफल मिश्र सांघिक गटात संदीप सिंग-इलावेनिल वलारिवन, अर्जुन बबुता-रमिता जिंदाल या जोड्यांना आपला नेम अचूक साधावा लागणार आहे. त्यांनी पदकाची कमाई केल्यास अन्य भारतीय नेमबाजांचाही आत्मविश्वास उंचावेल.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली

हेही वाचा >>>VIDEO: राहुल द्रविडचा लेक समित १८व्या वर्षी टी-२० लीगमध्ये खेळणार, लिलावात किती बोली लागली?

मनू भाकर, ऐश्वर्य प्रतापसिंह तोमर, अंजुम मुदगिल आणि इलावेनिल वलारिवन हे नेमबाज वगळता अन्य सर्व नेमबाज प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणार आहेत. ‘ऑलिम्पिक कोटा’ मिळवणाऱ्या नेमबाजांपेक्षा या वेळी हंगामात चांगली लय राखणाऱ्या नेमबाजांना ऑलिम्पिकसाठी संधी देण्यात आली आहे. यातील एक संदीप सिंग पहिल्याच दिवशी वेध साधेल. निवड चाचणीत त्याने भारतासाठी सर्वांत पहिला ऑलिम्पिक कोटा विश्वविक्रमासह मिळवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलवर बाजी मारली होती.

अन्य स्पर्धा प्रकारांत ५० मीटर थ्री-पोझिशनमध्ये आशियाई विजेती सिफ्त कौर समरा, अंजुम मुदगिल, पिस्तूल प्रकारात रिदम सांगवान, मनू भाकर, अर्जुन बबुता, श्रेयांसी सिंग, ईशा सिंग अशा नेमबाजांचा समावेश आहे. अनिश भानवाला, सरबज्योत सिंग, अर्जुन बबुता, अर्जुन सिंग चीमा, विजयवीर सिंग या नेमबाजांचे या स्पर्धेतून पदार्पणही होणार आहे, तर अंजुम ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणार आहे.

Story img Loader