भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशीच आपली पकड मजबूत केलीय. दुसऱ्या डावात खेळायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी चांगलच आव्हान दिल्याचं पहायला मिळालं. पहिल्या सात षटकांमध्ये भारतीय गोलंदाजींनी केवळ १४ धावा दिल्या. मात्र नंतर यजमान संघाने सामन्यावर पकड मजबूत केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा आफ्रिकेने ४० षटकांत २ बाद ११८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात शार्दूल ठाकूरने एडिन मार्करमला (३१), तर रविचंद्रन अश्विनने कीगन पीटरसनला (२८) पायचीत पकडले. कर्णधार डीन एल्गर (खेळत आहे ४६) मात्र एक बाजूने तग धरून असून त्याच्या साथीला रॅसी व्हॅन दर दुसेन ११ धावांवर खेळत आहे. त्यामुळे चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी टिचून मारा केला मात्र भारतीय संघाला यश मिळालं नाही. शार्दुल ठाकूरने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांना फारसं यश मिळालं नाही. त्यामुळेच सामन्यामध्ये भारतीय संघातील खेळाडूंमध्ये बरीच चर्चा वरचेवर होत असल्याचं पाहलया मिळालं. अशीच एक कमेंट स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालीय.

भारताचा कर्णधार के. एल. राहुलने केलेलं वक्तव्य स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं असून सध्या ते व्हायरल होताना दिसत आहे. राहुल सिराजला गोलंदाजीसाठी बोलवताना दिसतोय. मात्र त्याचवेळी तो सिराजला तुला गोलंदाजी करायला आवडेल ना की अजून थोड्या वेळाने गोलंदाजी करशील असंही विचारतोय. पण हे विचारताना त्याने वापरलेली भाषा सध्या चर्चेचा विषय ठरतेय. “मियाँ आ जा. ठिक है, गरम है? की चाहिऐ और दो ओव्हर, बोल दे,” असं राहुल सिराजला म्हणताना स्टॅम्प माईकमधील संभाषणावरुन स्पष्ट होतंय. म्हणजेच पुढची ओव्हर तू गोलंदाजी करणार की तुला वॉर्मअपसाठी आणखी वेळ हवाय असं राहुल सिराजला विचारत होता. हिच विचारपूस राहुलने बोली भाषेत केली. सिराज हा हैदराबादचा आहे तर राहुल कर्नाटकमधील. सिराज हैरदाबादचा असल्यानेच राहुलने त्याला मियाँ असं म्हटलं.

या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा आफ्रिकेने ४० षटकांत २ बाद ११८ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट झालं असूून आफ्रिकेला विजयासाठी १२२ धावांची गरज आहे तर दुसरीकडे भारताचे गोलंदाज शिल्लक आठ बळी गारद करून ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब करण्याची सुवर्णसंधी साधणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.