MI New York vs Texas Super Kings Video of Faf du Plessis catch goes viral: क्रिकेटच्या मैदानावर कधी-कधी अशी काही दृश्ये दिसतात, जी वर्षानुवर्षे लक्षात राहतील. कधी फलंदाज आपल्या वेगळ्या प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतात, तर काही वेळा गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकही आपल्या जबरदस्त कामगिरीने लक्ष वेधून घेतात. ताजे प्रकरण अमेरिकेत खेळल्या जात असलेल्या मेजर लीग क्रिकेटचे आहे, ज्यामध्ये ३९ वर्षीय फाफ डू प्लेसिसने असा झेल पकडला, जो पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. फॅफने घेतलेल्या अप्रतिम झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज फाफ डू प्लेसिस अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या मेजर लीग क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करत आहे. या लीगमध्ये तो टेक्सास सुपर किंग्जचा कर्णधार आहे. १७ जुलै रोजी, त्याच्या संघाचा सामना एमआय न्यूयॉर्कशी झाला, ज्यामध्ये फॅफच्या संघाने १७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात फाफ डू प्लेसिसने घेतलेल्या झेलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
वास्तविक, टेक्सास सुपर किंग्जने पहिल्या २० षटकात १५४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर मोनक पटेल शून्यावर बाद झाला. त्यानंतर शायन जहांगीर आणि स्टीव्हन टेलरने थोडा वेळ झुंज दिली, टेलर १५ धावा करून परतला. त्यानंतर पुरणनेही १९ धावा केल्या. अशा स्थितीत मुंबई इंडियन्स अडचणीत आली होती. आता संपूर्ण जबाबदारी झंझावाती फलंदाज टीम डेव्हिडवर होती.
टीम डेव्हिडचा झेल ठरला टर्निंग पाइंट –
टीम डेव्हिड ११९ चेंडूत २४ धावा करून खेळत होता. फॉर्मात असलेला हा फलंदाज संघाला सामना जिंकून देईल, असे वाटत होते. पण फॅफने अप्रतिम झेल घेत टीम डेव्हिडला माघारी पाठवले. टीम डेव्हिडने २० व्या षटकाच्या डॅनियल सॅम्सच्या पहिल्याच चेंडूवर जोरात फटका मारला, चेंडू उंच हवेत गेला, त्यावेळी ३९ वर्षीय फॅफने वेगाने धावत जाऊन अप्रतिम झेल घेतला. टीम डेव्हिड बाद होताच एमआय संघाने १७ धावांनी सामना गमावला.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर लीगचा सातवा सामना टेक्सास सुपर किंग्ज आणि एमआय न्यूयॉर्क यांच्यात झाला, ज्यामध्ये टेक्सास सुपर किंग्ज संघाने १७ धावांनी विजय मिळवला. विजयाचा हिरो ठरला डेव्हॉन कॉनवे, ज्याने ७४ धावांची खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना टेक्सास संघाने २० षटकात ७ गडी गमावून १५४ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात एमआय संघ २० षटकात ८ गडी गमावून १३७ धावांवर आटोपला.