ललीत मोदी १९ डिसेंबर रोजी होणारी राजस्थान क्रिकेट असोसिएशनची निवडणुक लढविणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी ललीत मोदींचा निवडणुक अर्ज त्यांच्या वकिलांनी दाखल केला असल्याचेही सांगण्यात येत आहे.
ललीत मोदी नागुर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधीत्व करणार असून राम पाल शर्मा यांच्याविरुद्ध राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत ललीत मोदी लढणार आहेत.
भारतीय क्रिकेट नियामाक मंडळाने (बीसीसीआय) ललीत मोदींवर क्रिकेटमधील हस्तक्षेपास आजीवन बंदी घातल्यानंतरही ललीत मोदींचे बीसीसीआयच्या निर्णयाला आव्हान देणारे हे पाऊल ठरणार आहे. ललीत मोदींचे कायद्यात्मक सल्लागार मेहमूद अब्दी यांनी ललीत मोदी राजस्थान क्रिकेट असोसिएशनची निवडणुक लढविण्यास तयार असल्याचे म्हटले. तसेच त्यासाठी कोणत्याही कायदेशीर गुंतागुंतीची अवस्था नाही आणि मोदी निवडणुक लढविण्यास पात्र असल्याचेही अब्दी म्हणाले.

Story img Loader