Mohammad Amaan century against Japan : भारतीय अंडर-१९ संघाचा कर्णधार मोहम्मद अमानने जपानविरुद्ध शानदार कामगिरी केली. एसीसी अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत त्याने अप्रतिम शतक झळकावले. अमानने १०६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. ८१ धावांवर दोन विकेट्स पडल्यानंतर मोहम्मद अमान फलंदाजीला आला. त्याने संघाची आणखी पडझड न होऊ देता योग्य प्रकारे डाव सावरला. अमानने सुरुवातीला कोणतीही घाई न करता सावधपणे खेळण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर त्याने आपले खरे रुप दाखवत दमदार फटकेबाजी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद अमान १२२ धावा करून नाबाद राहिला –

१८ वर्षीय मोहम्मद अमान शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने १०३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने ११८ चेंडूत नाबाद १२२ धावा केल्या. अमानने आपल्या खेळीत ७ चौकार मारले. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तत्पूर्वी जपान अंडर-१९ क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पूर्ण ५० षटके खेळून ६ गड्यांच्या मोबदल्यात ३३९ धावा केल्या. ही अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेतील कोणत्याही संघाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

आयुष म्हात्रेनेही झळकावले झंझावाती अर्धशतक –

भारताचा सलामीवीर आयुष म्हात्रेने या सामन्यात आपले अर्धशतक (५४ धावा) २७ चेंडूत पूर्ण केले. आयुषनेही आपल्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार मारले. केपी कार्तिकेयनेही मधल्या फळीत येऊन चांगली फटकेबाजी केली. त्याने ४९ चेंडूत ५७ धावांचे योगदान दिले. मात्र, वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. त्याला चांगली सुरुवात केली होती, पण मोठ्या खेळीत त्याचे रुपांतर करु शकला. तो २३ धावा करुन तो बाद झाला. अशा प्रकारे भारताने ६ गडी गमावून जपानला ३४० धावांचे मोठे लक्ष्य दिले.

हेही वाचा – Ayush Mhatre : १० चेंडूंत ४८ धावा अन् झंझावाती अर्धशतक; करोडपती वैभव सूर्यवंशी नव्हे, तर ‘हा’ खेळाडू आहे अंडर-१९ चा खरा हिरो

u

भारताच्या डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. आयपीएल २०२५ मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना विकत घेतलेला वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा आपली छाप सोडू शकला नाही. १३ वर्षीय सूर्यवंशी अवघ्या २३ धावा करून बाद झाला. वैभवने पाकिस्तानविरुद्ध केवळ १ धाव केली होती. मात्र, त्याचा जोडीदार आयुष म्हात्रेने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आरआरने वैभवला विकत घेतल्यापासून सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत. मात्र, आयपीएलमध्ये विकल्या गेल्यानंतर सूर्यवंशी काही मोठी कामगिरी करू शकलेला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammad amaan scores century off 106 balls against japan in under 19 asia cup 2024 during ind vs jap match vbm