Mohammad Kaif on Rishabh Pant: लीजेंड्स लीग क्रिकेट २०२३ ही स्पर्धा दोहा, कतार येथे खेळली जात आहे. येथे माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने एबीपी न्यूजशी खास बातचीत केली. यादरम्यान, त्याने आयपीएल २०२३ मध्ये ऋषभ पंतच्या बदलीबद्दल आणि सरफराज खानच्या विकेटकीपिंगबद्दल माहिती दिली आहे. याशिवाय इतरही अनेक पैलूंवर कैफने मोकळेपणाने गप्पा मारल्या.

मुलाखतीत ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल मोहम्मद कैफला विचारले असता, त्याने उत्तर दिले की, “माझे ऋषभ पंतशी बोलणे झाले आहे. तो जलद बरा होत आहे. तो आता बरा आहे. त्याच्यासोबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी होती… पण तो खूप मजबूत खेळाडू आहे, म्हणूनच तुम्हाला लवकरच तो भारतीय जर्सीमध्ये दिसेल.”

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?
Mohammed Siraj Travis Head May Face ICC Disciplinary Action After Heated Argument
Siraj-Head Fight: सिराज-हेडला भर मैदानात वाद घालणं पडणार महागात, ICC कारवाई करण्याच्या तयारीत

आयपीएल २०२३ मध्ये ऋषभ पंतची जागा कोण घेणार? त्याच्या जागी विकेटकीपिंग कोण करणार? अनेक रिपोर्ट्समध्ये सरफराज खान दिल्लीचा यष्टिरक्षक असेल असे बोलले जात आहे. या प्रश्नाच्या उत्तरात कैफ म्हणाला, “सरफराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये कसे तरी बसवायला दिल्लीला आवडेल. तो चांगला फलंदाज असून फॉर्मातही आहे. पण त्याने कधी विकेटकीपिंग केले असेल असे मला वाटत नाही. होय, जर दिल्ली त्याच्याकडे अर्धवेळ यष्टीरक्षक म्हणून पाहत असेल, तर ती वेगळी बाब आहे.”

हेही वाचा – IND vs AUS ODI: मैदानात नव्हे तर मुंबईच्या गल्ली क्रिकेटमध्ये रमला डेव्हिड वॉर्नर, VIDEO होतोय व्हायरल

तसेच, त्याच्याकडे केएस भरतचा पर्याय आहे. पण सरफराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत आणि तो आयपीएलमध्ये खेळण्यास पात्र आहे. कैफ पुढे म्हणाला की ऋषभ पंतचा बदली खेळाडू मिळणे अशक्य आहे.

आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण असेल? या प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला, ऋषभ पंतच्या जागी कर्णधार… डेव्हिड वॉर्नर सर्वात मोठा दावेदार आहे. याआधीही तो आयपीएलमध्ये कर्णधार होता. तसेच, अक्षर पटेल देखील एक पर्याय आहे. तो बराच काळ आयपीएलमध्ये खेळत आहे.

हेही वाचा – IND vs AUS ODI Series: ‘…म्हणून रोहित शर्मा पहिल्या वनडेत खेळणार नाही’, जाणून घ्या काय आहे कारण?

तो पुढे म्हणाला की, ”आजकाल फ्रँचायझी भारतीय क्रिकेटपटूंना कर्णधार बनवू इच्छितात. परदेशातील खेळाडूंचा आता ट्रेंड राहिलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सला यावर चर्चा करायला नक्कीच आवडेल.”

Story img Loader